Vinod Tawde : नालासोपाऱ्यात मोठा राडा! विनोद तावडेंच्या 'त्या' डायरीत काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vinod Tawde Latest News
Vinod Tawde Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं!

point

हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर केले मोठे आरोप

point

बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंविरोधात कारवाईची केली मागणी

Vinod Tawde Video:  विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं. तावडे नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये गेले होते. त्या ठिकाणी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि तावडेंना घेरलं. तावडेंनी मला 25 वेळा फोन केला आणि माफ करण्यासाठी विनंती केली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. दरम्यान, तावडेंकडे असलेली एक डायरी बविआच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. परंतु, या डायरीत नेमकं काय दडलंय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ADVERTISEMENT

विनोद तावडेंकडे सापडलेल्या डायरीत काय? 

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंकडून एक डायरी जप्त केली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर स्वत: दाखल झालेले आहेत. ठाकूर यांच्याविरोधात भाजपचे राजन नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पैसे कुणाला देण्यात आले आहेत? याचा तपशील तावडेंच्या डायरीत असल्याचं समजते. या डायरीत पैशांच्या संदर्भात माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : विनोद तावडेंना घेरलं, पैसे वाटताना पकडल्याचा आरोप

तावडेंवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत त्यांना बाहेर सोडणार नाही, अशी भूमिका बविआचे प्रमुख हिंतेंद्र ठाकूर यांनी घेतली आहे. जर कारवाई केली नाही, तर राजन नाईक आणि तावडे यांना आम्ही इथेच ठेवणार आहोत, असा इशाराही हिंतेंद्र ठाकूर यांनी दिला आहे. विवांता हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडलीय. कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना रोखून धरलं आहे. तुम्ही इथे कशासाठी आले आहात? असा सवाल तावडेंना विचारला जात आहे. कार्यकर्ते बॅगेतून पैसे काढून दाखवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पैसे वाटण्यासाठीच तावडे इथे आले आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पोलिसांकडूनही या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Today Gold Rate: निवडणुकीच्या धामधूमीत सोनं-चांदीनं केलंय मार्केट जाम! मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT