Vinod Tawde : पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे काय म्हणाले? नालासोपाऱ्यात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vinod Tawde Press Conference
Vinod Tawde Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नालासोपाऱ्याच्या घटनेबाबत विनोद तावडेंची मोठी प्रतिक्रिया

point

"कार्यकर्त्यांची बैठक होती आणि..."

point

विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

Vinod Tawde Press Conference: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान उद्या 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं समोर आलं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी या मतदारसंघात आले होते, असा आरोप बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला. ही धक्कादायक घटना विवांता हॉटेलमध्ये घडली. त्या ठिकाणी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि तावडेंना घेरलं. तावडेंनी मला 25 वेळा फोन केला आणि माफ करण्यासाठी विनंती केली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. अशातच विनोद तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधून या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. 

ADVERTISEMENT

विनोद तावडे काय म्हणाले?

"नालासोपाऱ्यात वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीचे आचारसंहितेचे नियम काय आहेत? ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की, मी पैसे वाटत होतो. मी बोललो सर्व चेक करा, काही हरकत नाही. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर तेही आले होते. त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. पैसे वाटप होत असतील, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग, पोलीस, सीसीटीव्ही सर्वकाही आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा जी असते, त्यावर सही कशी करायची? हरकती कशा नोंदवायच्या? अशा गोष्टी सांगण्यासाठी त्या बैठकीत पोहोचलो होतो. निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी". 

हे ही वाचा >> Vinod Tawde Vs Hitendra Thakur : "तावडेंनी 25 फोन केले, माफी मागितली, सोडा म्हणाले...", ठाकूर यांनी खळबळ उडवली

मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंकडून एक डायरी जप्त केली आहे. पैसे कुणाला देण्यात आले आहेत? याचा तपशील तावडेंच्या डायरीत असल्याचं समजते. या डायरीत पैशांच्या संदर्भात माहिती असल्याचं बोललं जात आहे.तावडेंवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत त्यांना बाहेर सोडणार नाही, अशी भूमिका बविआचे प्रमुख हिंतेंद्र ठाकूर यांनी घेतली आहे. जर कारवाई केली नाही, तर राजन नाईक आणि तावडे यांना आम्ही इथेच ठेवणार आहोत, असा इशाराही हिंतेंद्र ठाकूर यांनी दिला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Hitendra Thakur: 'तावडेंनी पैसे आणले ही माहिती मला भाजपमधल्या मित्रांनीच दिली', हितेंद्र ठाकूर हे काय बोलून गेले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT