Jitendra Awhad: 'मनुस्मृती'वरून भुजबळांकडून थेट आव्हाडांची पाठराखण, महायुतीलाच सुनावलं!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chhagan bhujbal reaction on jitendra awhad controversy dr babasaheb ambekar poster manusmriti dahan deepak kesarkar
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांची पाठराखण केली आहे.
social share
google news

Chhagan Bhujbal Support Jitendra Awhad : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश करण्याच्या मुद्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्रमकता दाखवत महाडाच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले होते. या दरम्यान आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) प्रतिमेची विटंबना झाली होती.आपली ही चुक लक्षात येताच आव्हाडांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर राज्यभरातून आव्हाडांचा निषेध करण्यात येत आहे. यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांची पाठराखण केली आहे.  (chhagan bhujbal reaction on jitendra awhat controversy dr babasaheb ambekar poster manusmriti dahan deepak kesarkar)  

खरं तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे काही श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीरं केलं होतं. यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक पावित्रा घेत महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले होते. या दरम्यान आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती. या घटनेचा भाजपने निषेध करत राज्यभर आंदोलनाला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा : 'भाजप-NDA महाराष्ट्रात 'एवढ्या' जागांवर हरणार'

या मुद्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.''जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले होते. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना होती. रागाच्या भरात त्यांनी मनुस्मृती जाळली होती. त्यानंतर त्यांनी न बघताच चित्र फाडलं. आव्हाडानंतर इतर कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं अनुकरण केले. पण यावर त्यांनी माफीही मागितली. पण मुळ मुद्दा जो आहे आम्हाला मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाडचं राहील'',असे विधान करून भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

''मनुस्मृतीचे श्लोक शालेय शिक्षणात अचानक आणण्याची गरज आहे? त्यातील दोन श्लोक चांगले आहेत म्हणतात, पण चंचूप्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वरांचे श्लोक नाही आहेत का? संत तुकारामाचे नाही आहेत का? अनेक संताचे श्लोक आहेत. त्यामुळे त्यांचा चंचु्प्रवेश का करायचा? याच्या मागे काय चाललंय हे शोधलं पाहिजे. बहुजन समाजातील दीपक केसरकर त्याची भलामन करतात हे अतिशय दु:खदायक वाटतं'',  असे विधान करून भुजबळांनी महायुतीवर टीका केली. 

हे ही वाचा : Pune Accident: पोराच्या रक्तात दारू सापडू नये म्हणून आईने दिलं ब्लड सॅम्पल!

आव्हाडांनी मानले भुजबळांचे आभार 

ADVERTISEMENT

छगन भुजबळ यांनी पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत. ''मा. भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे.

ADVERTISEMENT

मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब ! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे''.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT