Rahul Gandhi : 'एक हैं तो सेफ हैं' घोषणेची खिल्ली उडवली, राहुल गांधींचा PM मोदी-अदानींवर निशाणा
'एक हैं तो सेफ हैं'या घोषणेच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवत धारावीच्या मुद्द्यावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राहुल गांधींची मुंबईत पत्रकार परिषद
पंतप्रधान मोदी, उद्योगपती अदानींवर निशाणा
धारावीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी 'एक हैं तो सेफ हैं'या घोषणेच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवत धारावीच्या मुद्द्यावर निशाणा साधला. राहुल गांधींनी यावेळी एक तिजोरी उघडली, ज्यावर लिहिलेलं होतं 'एक हैं तो सेफ हैं'. या तिजोरीमधून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती यांचा फोटो दाखवला. एकत्र येऊन यांना धारावीचा 1 लाख कोटींचा धंदा सुरू आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Yogi Adityanath : मी 'बटेंगे तो कटेंगे' म्हटल्यावर वाईट वाटतं, पण रझाकारांनी खरगेंच्याच... CM योगी काय म्हणाले?
राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून एक हैं तो सेफ हैं हा नारा देण्यात आला होता. यावरुन काँग्रेससह विरोधी पक्ष नेत्यांकडून त्यांच्यावर घणाघात करण्यात आला. यावरुन राहुल गांधी यांनीही मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसंच धारावीला या सर्वांमुळे फटका बसणार आहे असं राहुल गांधी म्हणाले.
धारावीच्या जमिनीवर तिथल्या लोकांचा हक्क आहे, ते तिथे काम करतात, छोट्या उद्योगांचं ते केंद्र आहे, तसंच तिथे खारफुटी आहे. ती जागाही हडपण्याचा प्रयत्न होतोय. हे सगळं काम एका व्यक्तिच्या मदतीसाठी होतंय. सर्व यंत्रणा फक्त एका व्यक्तिसाठी कामाला लावली जातेय. त्याच व्यक्तिला देशातील विमानतळ दिले जातात, संरक्षण विभागाचं काम दिलं जातं.. मी तुम्हाला स्पष्ट दाखवलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जुनं नातं आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी अदानी आणि मोदींचा फोटोकडे हात दाखवला. महाराष्ट्राचं धन इथल्या जनतेला मिळेल की एका व्यक्तिला मिळेल? हाच निवडणुकीचा मुद्दा आहे. वेदान्ता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस प्रोजेक्ट, आयफोन निर्मिचा प्लांट गेला. इंटरनॅशनल फायनान्शिअर सर्व्हिस सेंटर, बल्क ड्रग्ज पार्क असे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं महाराष्ट्रातील तरुणांच्या 5 लाख नोकऱ्या गेल्या असं म्हणत राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT