Yogi Adityanath : मी 'बटेंगे तो कटेंगे' म्हटल्यावर वाईट वाटतं, पण रझाकारांनी खरगेंच्याच... CM योगी काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरच्या सभेत काय म्हणाले CM योगी?

point

मल्लिकार्जून खरगेंच्या कुटुंबासोबत काय झालं होतं?

point

बटेंगे तो कटेंगे नाऱ्याचा पुनरोच्चार केला?

CM Yogi Adityanath Kolhapur : कोल्हापूरमध्ये काल महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे बडे नेते प्रचारासाठी मैदानात आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या संपूर्ण प्रचारात गाजल्या त्या भाजप नेत्यांनी दिलेल्या दोन घोषणा. योगी आदित्यनाथ यांनी दिलेली बटेंगे तो कटेंगेची घोषणा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली 'एक हैं तो सेफ हैं'ची घोषणा. या घोषणांनंतर विरोधकांकडून टीकेची राळ उठली. तसंच महायुतीमध्ये सहभागी असलेल्या आणि खुद्द भाजपच्या नेत्यांनीही या घोषणेचा विरोध केला. मात्र आता त्यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांनी कोल्हापूरमधून हा नारा दिला आहे. 

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>CM Eknath Shinde Nandgaon Sabha : मुख्यमंत्री शिंदेंच्या नांदगावच्या सभेत महिलांना कोंडलं?

 

"काँग्रेसचं चांगलं नेतृत्व असतं, तर भारताचं विभाजन झालं नसतं, पाकिस्तान वेगळा झाला नसता," असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निशाणा साधत, "त्या इथे आल्या असतील, पण विकासाबद्दल, सुरक्षेबद्दल, दहशतवाद, नक्षलवादाबद्दल बोलल्या नसतील, कारण त्या तुम्हाला तोडण्यासाठीच आल्या होत्या" असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मल्लिकार्जून खरगे यांचं गाव कर्नाटकच्या बिदरमध्ये आहे. त्यांच्या गावामध्ये 1947 मध्ये हैदराबादच्या निजामाच्या रझाकाराने जाळून टाकलं होतं. खरगेजींची आई, काकू, बहीण यांचा तेव्हा जळून मृत्यू झाला होता. पण जेव्हा याबद्दलच म्हणतो की, 'बटोंगे तो कटोंगे' तर खरगे यांना वाईट वाटतं. खरगेजी सत्य मान्य करा, निजाम कोण होता हे सांगा? रझाकार कोण होते?  निजामाच्या रझाकारांनीच हिंदुंना मारलं होतं हे सांगा. आणि निजामाचे रझाकार हे तेच कट्टरतावादी मुस्लिम होते, जे आता वेगवेगळ्या हिंदू धर्माच्या मिरवणुकींवर दगडफेक करतात आणि विशाळगडावर कब्जा करतात, असं म्हणत योगींनी टीका केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >> CM Eknath Shinde Nandgaon Sabha : मुख्यमंत्री शिंदेंच्या नांदगावच्या सभेत महिलांना कोंडलं?

योगी आदित्यनाथ यांनी पुढे आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करत गंभीर आरोप केले. "महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला वाटण्यासाठी आले आहेत. काँग्रेसमध्ये इंग्रजांचेच जिन्स आहेत. हे तुम्हाल जातीच्या, प्रदेशाच्या, भाषेच्या नावावर वाटून टाकतील आणि पुन्हा तुम्हाला रझाकारांच्या माध्यमातून भारताच्या एकतेला आणि अखंडतेला धोका पोहोचवतील. 2014 पूर्वी पाकिस्तानी भारतात घुसायचे, हल्ले करायचे, दहशत निर्माण करायचे, तेव्हा आम्ही विरोध केल्यावर काँग्रेसवाले म्हणायचे की, संबंध खराब होतील, त्यामुळेच 2014 ला जनतेने नरेंद्र मोदींना निवडून दिलं. त्यामुळे आता पाकिस्तान घुसखोरी करायीच हिंमत करत नाही" असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT