Devendra Fadnavis : ''शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंनी मला दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर''
Devendra Fadnavis Big Revealation : . मी तुमच्याशी (ठाकरे) फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पाच वर्ष ज्या व्यक्तीने स्वत:च्या पक्षासमोर तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं. किमान तुम्ही फोन उचलून इतकं तरी बोलू शकता. नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळ ठरलं, आम्ही नाही येऊ शकत.पण तुम्ही फोन पर घेणार नसाल, तर त्याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. याचा अर्थ युतीचे दरवाजे त्यांनी बंद केले आहेत, असे फडणवीसांनी म्हणत भाजप-शिवसेना युती ठाकरेंनी तोडल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Big Revealation : एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बंडखोरीच्या वेळेस उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पण मी त्यांना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयावर तुम्ही वरिष्ठांशी बोला, असा सल्ला त्यांना दिला होता आणि माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याच मी ठाकरेंना सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (devendra fadnavis big revealation udhhav thackeray offer cm post while shiv sena split eknath shinde)
ADVERTISEMENT
झी 24 तासने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतील देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. ''जेव्हा शिंदे आणि (भाजप) आम्ही सोबत येत होतो. त्या दिवशी सकाळी मला उद्धवजींचा फोन आला होता. ते मला म्हणाले, तु्म्ही मी कशाला त्यांना (बंडखोरांना) सोबत घेताय. त्यांना (एकनाथ शिंदे) कशाला पद देताय. मी संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन येतो, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंनी यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला. मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी त्यांना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याच मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी मी बेईमानी करणार नाही, असे त्यांनी मी स्पष्ट सांगितलं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला.
हे ही वाचा : शरद पवारांची अभिजीत पाटलांनी सोडली साथ, माढ्यात किती धोका?
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना-भाजप युती तुटल्याच्या घटनेवरही भाष्य केले. ''मी तुमच्याशी (ठाकरे) फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पाच वर्ष ज्या व्यक्तीने स्वत:च्या पक्षासमोर तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं. किमान तुम्ही फोन उचलून इतकं तरी बोलू शकता. नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळ ठरलं, आम्ही नाही येऊ शकत.पण तुम्ही फोन पर घेणार नसाल, तर त्याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. याचा अर्थ युतीचे दरवाजे त्यांनी बंद केले आहेत, असे फडणवीसांनी म्हणत भाजप-शिवसेना युती ठाकरेंनी तोडल्याचा आरोप केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भटकती आत्मावरही प्रतिक्रिया दिली. ''मोदींनी कुणाच नाव तर घेतलं नव्हत. त्यांनी टोपी फेकली ज्याला आपल्या डोक्यावर घ्यायची होती त्याने घेतली. मोदींनी एकच वस्तुस्थिती सांगितली, महाराष्ट्रात काही लोक अशी आहेत, जी सत्तेतून बाहेर गेल्यावर सत्तेला डिस्टेबलाईज कसे करता येईल,याचा प्रयत्न करतात. आणि ''हम ना खेले, तो खेल बिघाडे''...अशा मानसिकतेत ते काम करतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सोडला तर नाईकांनंतर कुणीही पाच वर्ष पुर्ण करू शकला नाही. अशाप्रकारे त्यांनी फॅक्ट सांगितला आणि काहींनी तो जिव्हारी लावून घेतला, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Sharad Pawar : "मोदी दर आठवड्याला...", पवारांचं गंभीर विधान, आयोगाकडे बोट
ADVERTISEMENT