Udddhav Thackeray: संसदेतील 'त्या' VIDEO वरून ठाकरेंनी राणेंना डिवचलं, म्हणाले अरे प्रश्न...

मुंबई तक

ADVERTISEMENT

'त्या' VIDEO वरून ठाकरेंनी राणेंना डिवचलं, म्हणाले अरे प्रश्न...
'त्या' VIDEO वरून ठाकरेंनी राणेंना डिवचलं, म्हणाले अरे प्रश्न...
social share
google news

Udddhav Thackeray vs Narayan Rane: सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणूक 2024 साठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्वात कट्टर विरोधकांची लढाई रंगली आहे. शिवसेना (UBT)चे उमेदवार विनायक राऊत आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे हे आमनेसामने आहेत. अशावेळी उद्धव ठाकरेंनी आज (3 मे) कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली.  याच सभेत ठाकरेंनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला. (lok sabha election 2024 ratnagiri sindhudurg constituency uddhav thackeray scolded narayan rane over viral video in parliament)

'दोन-तीन वेळा तुझ्या इथे येऊन तुला आडवा केला.. तरी लाज वाटत नाही..', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंच्या मागील निवडणुकातील पराभवावरुन त्यांना डिवचलं. पण याचवेळी त्यांनी नारायण राणेंच्या संसदेतील व्हायरल व्हिडीओवरून देखील डिवचलं.

हे ही वाचा>> 'रात्री कट कारस्थानं करून माझं..', मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप

'इथल्या त्यांच्या उमेदवाराला सांगतोय उगाच काही तरी बडबडू नको.. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षांतील संसदेतील भाषणं काढा त्याचे व्हिडीओ लावा आणि याने केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिलंय ते बघा..' अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. पाहा उद्धव ठाकरे कणकवलीत नेमकं काय म्हणाले.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचा राणेंच्या बाल्लेकिल्यात जाऊन हल्लाबोल

'आज मी कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी मला धमकी दिली.. आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत. त्यामुळे म्हणीतील नावं मी काही ठरवलेली नाही.. एक म्हण अशी आहे की, 'शुभ म्हण रे नाऱ्या...' 

'मी येऊन उभा ये.. तू आडवा येच.. तुला गाडूनच पुढे जातो. आडवा येच तू.. अरे लाज वाटली पाहिजे.. दोन-तीन वेळा तुझ्या इथे येऊन तुला आडवा केला.. माझ्या घराच्या इकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला.. लाज नाही.. बडबडतो आपला बडबडतोय..' 

'अमित शाह म्हणाले या मुद्द्यावर बोला, त्या मुद्द्यावर बोला.. अहो अमित शाहजी तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या मुद्यावर बोला.. 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उबवत बसला आहात. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंड्यातून पिल्लू का बाहेर येत नाही?' 

ADVERTISEMENT

'ज्याला बाळासाहेबांनी गेट आऊट सांगितलं होतं त्याला आज तो तुमचा इथला उमेदवार आहे.. तुला बघून घेतो, तुचं हे करतो.. काय बघून घेतोस तू? ज्या काय करायचं ते कर.. गेट आऊट.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शिंदेंना सोडाव्या लागल्या 'या' 8 जागा, शिवसैनिक काय देणार कौल?

'कोणाला धमक्या देतो.. 2005 पर्यंत त्यांची मस्ती होती.. पोटनिवडणुकीत दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर वैभव, विनायक उभे राहिले.. त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहिलात.' 

'श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे आमचा रमेश गोवेकर.. अंकुश राणे ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे. हत्या झाला.. पळवला गेला हे माहितए.. पण कोणी पळवला तेच माहिती नाही.' 

'अमित शाहांना हे काय माहिती नाही? आता राणेंना मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील.. तर या गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असं म्हणायचं का?' 

'या हत्या कशा झाल्या.. केंद्रीय गृहमंत्री आहेत तर लावा ना शोध.. पण शोध लागणार नाही. जो-जो तुमच्याकडे आला तो वॉशिंग मशीनमधून धुवून चकाचक झाला असं तुम्हाला वाटत असलं तरी जनतेच्या डोळ्यात त्यांनी केलेली पापं आजही कायम आहेत.' 

'इथल्या त्यांच्या उमेदवाराला सांगतोय उगाच काही तरी बडबडू नको.. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षांतील संसदेतील भाषणं काढा त्याचे व्हिडीओ लावा आणि याने केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिलंय ते बघा..' 

असा तुफान हल्ला उद्धव ठाकरेंनी कणकवलीमधील सभेतून चढवला. आता ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT