Lok Sabha Election Result 2024 : लोकसभेच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 result pm narendra modi reaction on lok sabha result bjp nda vs india alliance
लोकसभेच्या या निकालानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
social share
google news

Pm Narendra Modi Reaction on Lok Sabha 2024 Result : लोकसभा निवडणुकीत भापजने 400 पारचा नारा दिला होता. मात्र आजच्या निकालात त्यांना 300 पार देखील करता आल्या नाही आहेत. पण एनडीएने देशात बहुमत मिळवलं आहे. लोकसभेच्या या निकालानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.  (lok sabha election 2024 result pm narendra modi reaction on lok sabha result bjp nda vs india alliance) 

पंतप्रधान मोदींचं ट्विट जशाच तसं...

जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

या आपुलकीसाठी मी जनता जनार्दन यांना प्रणाम करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही सुरूच ठेवू, अशी ग्वाही देतो. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी सलाम करतो. शब्द त्यांच्या अपवादात्मक प्रयत्नांना कधीही न्याय देणार नाहीत.

लोकसभेच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मोदी म्हणाले, 'जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या आपुलकीसाठी मी जनता जनार्दन यांना प्रणाम करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही सुरूच ठेवू, अशी ग्वाही देतो, असे मोदींनी सांगितले. तसेच मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी सलाम करतो, असे मोदी म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला 295 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडी 231 जागा जिंकता आल्या आहेत. तर इतर पक्षांना 17 जागा मिळाल्या आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT