Uddhav Thackeray : ठाकरेंची मोठी खेळी, भाजपला देणार जबर झटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar bjp ex mayor raju shinde 6 bjp  corporator will udhhav thackeray shiv sena ubt
पक्षप्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
social share
google news

Raju Shinde,  6 Corporator of bjp will join shiv sena UBT : इसरार चिश्ती, संभाजीनगर : शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 7 जुलैपासून संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधीच भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण भापजचे माजी महापौर राजू शिंदे (Raju Shinde) यांच्यासह 5 ते 7 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश रविवारीच पाड पडण्याची शक्यात आहे. या पक्षप्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.  (chhatrapati sambhajinagar bjp ex mayor raju shinde 6 bjp  corporator will udhhav thackeray shiv sena ubt) 

ADVERTISEMENT

मी 1995 पासून भाजपसाठी काम करतोय. पण सध्या आम्ही भाजप आणि शिंदे गटासाठी काम करतोय. पण शिंदे गट आमचा वापर करून घेत आहे, असा आरोप माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी नागरीकांची आणि कार्यकर्यांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार सुरु आहे, असे शिंदे यांनी सांगितले. माझ्यासोबत 6 नगरसेवक, दोन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. 

लोकसभा निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भाजपने येथे मेहनतीने काम केले आहे.पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचे काम केले. पण भाजप आमदार, खासदारांनी कृतज्ञताही व्यक्त केली नाही, अशी नाराजी शिंदे यांनी यावेळी बोलूनही दाखवली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin योजनेत मोठा बदल, घरोघरी येणार टीम; काय आहे सातारा पॅर्टन?

शिरसाटांच्या अडचणी वाढणार 

7 जुलैला भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची अडचण वाढणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राजू शिंदे अपक्ष उभे असताना 43,347 मते मिळाली होती. तर संजय शिरसाट यांना 83,792 मते मिळाली होती. त्यामुळे 40 हजार मतांनी संजय शिरसाट यांचा विजय झाला होता. 

दरम्यान ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्चिम विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर राजू शिंदे यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "गुजरातहून बस आणून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न"; संजय राऊत संतापले!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT