Maharashtra Lok Sabha : "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज
Anandrao Adsul on Maharashtra lok sabha election : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत ४८ लोकसभा मतदारसंघात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल, असे विधान अडसूळ यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे मत
गजानन कीर्तिकर यांची अडसूळ यांनी केली पाठराखण
Lok Sabha election Maharashtra Anandrao Adsul : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे, असे आधी महायुतीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते महाविकास आघाडीचं कौतूक करताना दिसत आहे. महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल, या गजानन कीर्तिकर यांच्या विधानाला आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दुजोरा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे मविआचा महायुतीला फटका बसेल, असंही अडसूळ यांनी म्हटले आहे. (Mahayuti will get set back by Maha Vikas Aghadi in Maharashtra in lok sabha election)
ADVERTISEMENT
आनंदराव अडसूळ महाविकास आघाडीबद्दल काय बोलले?
महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल असं गजानन कीर्तिकर म्हणालेत. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना आनंदराव अडसूळ म्हणाले की, "आहे. खरं आहे ते. कारण एकूण जे आपण वातावरण बघतोय, संपूर्ण राज्यात आणि देशात... ते वातावरण आहे, हे आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागेल."
हेही वाचा >> पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?
"चांगली गोष्ट आहे की विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली आहे. एकमेकांच्या हातात हात घालून खरे काम करताहेत. महायुतीला थोडा फार फटका बसेल. नक्की बसेल."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाईची मागणी
"आता जो आरोप होतोय की, त्यांनी (गजानन कीर्तिकर) त्यांना (अमोल कीर्तिकर) मदत केली की काय? क्षणभर जर आपण असं म्हटलं की, त्यांनी (गजानन) थोडी मदत केली असेल... एका घरात आम्ही राहत आहोत. आणि आपण त्या मुलाला जन्म दिला आहे. आपलं वय झालं आहे. खऱ्या अर्थाने वारसा हक्काने त्याला आपण सगळे देण्याचा प्रयत्न करतो", अशी भूमिका अडसूळ यांनी मांडली.
हेही वाचा >> आरोपी की, ड्रायव्हर... कोण चालवत होतं पोर्श कार? अखेर सत्य आलं समोर
"तर ज्यावेळी त्यांना जाणवलं असेल की, आता उभा राहिलाच आहे. जरी आमचे तात्विक वाद असले, तरी पण त्यांना मदत केली गेली पाहिजे, असं वाटलं असेल तर ते चूक नाही. केली की नाही, मला सांगता येणार नाही. परंतू ते चूक आहे, असे म्हणता येणार नाही", असे सांगत अडसूळ यांनी त्यांची पाठराखण केली.
ADVERTISEMENT
कोण आहे शिशिर शिंदे?
"गजानन कीर्तिकर जे बोलले, त्यात चुकीचे काय हे मला कळलेलं नाही. मुलगा असून प्रचार करू शकत नाही, याची खंत वाटते. खंत वाटणे हा पण गुन्हा आहे. आता शिशिर शिंदे... कोण आहे शिशिर शिंदे? तसं पाहिलं तर... गजाभाऊ कीर्तिकरांनी आपलं या चळवळीत दिलं आहे. त्यांना लोकांना भरीव अशी मदत केलेली आहे. शिशिर शिंदे आहे कोण? तू कुठून आलास. होतास कुठे? शिवसेनेतून मनसेत, मनसेतून पुन्हा शिवसेनेत. त्यानंतर या शिवसेनेत. त्याला काय अधिकार आहे", असा उलट सवाल अडसूळ यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT