Mahadev Jankar: बारामती, माढा नव्हे तर 'या' जागेवरून जानकर लोकसभा लढवणार, राष्ट्रवादीच्या कोट्यातून मिळाली जागा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mahadev jankar contest election on parbhani seat sunil tatkare press coference ajit pawar maharashtra politics
परभणी लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
social share
google news

Mahadev jankar contest election on Parbhani seat : महायुतीकडून परभणी लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे माजी खासदार संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परभणी लोकसभेत महादेव जानकर विरूद्द संजय जाधव अशी लढत होण्याची शक्यता आहे.  (mahadev jankar contest election on parbhani seat sunil tatkare press coference ajit pawar maharashtra politics)  

ADVERTISEMENT

रासपचे महादेव जानकर सुरूवातीला महायुतीवर नाराज होते. महायुतीत छोट्या पक्षांना मिळत असलेल्या वागणुकीवरून जानकर नाराज होते. जानकरांची हीच नाराजी हेरत शरद पवारांनी त्यांना माढाची जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर महायुतीने मोठा धोका लक्षात घेत जानकरांना एक जागा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी महायुतीने जानकरांसमोर बारामती, माढा आणि परभणी असे तीन पर्याय ठेवले होते. त्यानुसार आज राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकर यांना परभणीची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आता महादेव जानकर परभणीतून महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. 

हे ही वाचा :Devendra Fadnavis : ''बिचाऱ्या अंबादास दानवेंना त्रास...'',

सुनील तटकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे परभणीतून महादेव जानकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार असल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता जानकरांची थेट लढत ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यासोबत होणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :आधी उल-हक, आता गंभीर... Virat Kohli ने मिटवले सर्व मतभेद; काय आहे 'मैत्री'ची इनसाइड स्टोरी?

दरम्यान रायगडमधून सुनील तटकरे रिंगणात असणार आहेत. बारामतीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित आहे. तर शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT