Lok Sabha : 'अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, पाकीट वाटली...'; रोहित पवारांचा गंभीर आरोप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maharashtra fourth phase voting day rohit pawar big allegation distribute money ahmednagar lok sabha 2024 sujay vikhe patil vs nilesh lanke
अनेक मतदान केंद्रांवर विरोधकांना बूथही लावता आले नाहीत,
social share
google news

Rohit Pawar, Ahmednagar Lok Sabha 2024 : अहमदनगर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संबंधित व्हिडिओत देखील रोहित पवारांनी  शेअर केले आहेत. इतकचं नाही तर या मतदार संघात पाकीट वाटप झाल्याचाही आरोप रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला आहे.या आरोपानंतर रोहित पवारांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) कारवाईची मागणी केली आहे. (maharashtra fouth phase voting day rohit pawar big allegation distribute money ahmednagar lok sabha 2024 sujay vikhe patil vs nilesh lanke)   

ADVERTISEMENT

रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधित पुरावे देऊन गंभीर आरोप केले आहेत. ''उत्तरे'तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात झाल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील, अशी अपेक्षा आहे, असे रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असे म्हणत रोहित पवारांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये पैसे रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे रोहित पवारांनी पैसै वाटप झाल्याचा आरोप केला आहे. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis Exclusive : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार का?

उत्तरेतून पाकीट आली...

रोहित पवारांनी दुसरं ट्विट करत मतदार संघात पाकीट वाटल्याचा आरोप केला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात आज 'राजा' असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा 'प्रसाद' आणि 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गम्मत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत 'यंत्रणे'ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला... आता 'प्रसादात'ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा 'राजा' कसा उदार होणार?, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच या पाकीटाचा फोटो देखील रोहित पवारांनी शेअर केला आहे. या पाकिटावर सुजय विखे पाटलांचं नाव आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान लोकांनी निवडणूक हातात घेणं म्हणजे काय, हे बघायचं असेल तर ते नगर दक्षिण (जि. अहील्यानगर) लोकसभा मतदारसंघात बघायला मिळतं.. अनेक मतदान केंद्रांवर विरोधकांना बूथही लावता आले नाहीत, यातच विजय कुणाचा हे सिद्ध होतं असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा :  पवारांवर राज ठाकरेंचा थेट हल्ला, 'फोडाफोडीच्या राजकारणाला...'

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुजय विखे पाटील विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्याच थेट लढत होत आहे. त्यात आता रोहित पवारांनी केलेल्या आरोपानंतर आता निवडणूक आयोग काय कारवाई करतो?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT