Modi Cabinet 2024 : महाराष्ट्रातील 'हे' नेते होणार मंत्री, शिंदेंकडून कुणाला संधी?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदी मंत्रिमंडळ 3.0

point

महाराष्ट्रातील पाच नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

point

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव घेणार मंत्रिपदाची शपथ

Modi 3.0 Cabinet : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकारचा आज शपथविधी सोहळा होत असूनू, महाराष्ट्रातील काही नेतेही मोदींसोबत मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही नाव सुचवले गेले आहेत. महाराष्ट्रातील कोणते खासदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार, हे जाणून घ्या... (Nitin Gadkari, Piyush goel, Prataprao Jadhav, Raksha khadse and Ramdas Athawale will take oath as cabinet minister)

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज (9 जून) सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये होत आहे. मोदींसोबत कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार याबद्दल उत्सुकता आहे. ज्या नेत्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, त्यांची नावे समोर येत आहेत. 

महाराष्ट्रातून कुणाला मंत्रिपदाची संधी?

ज्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पाच नेत्यांची नावे निश्चित झाली आहेत. 

हे वाचलं का?

दोन वेळा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले नितीन गडकरी हे शपथ घेणार, हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. गडकरी सलग तिसऱ्यांदा मंत्री होणार आहेत.

हेही वाचा >> ''तुम्ही आरक्षण दिलं मग...'', फडणवीसांवर जरांगे भडकले! 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या पीयूष गोयल यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गोयल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला आहे. तेही मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

ADVERTISEMENT

पाहा व्हिडीओ >> NDA च्या बैठकीनंतर मोदी महाराष्ट्रातील नेत्यांना कसे भेटले? 

रावेर लोकसभ मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनाही पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला आहे. त्यामुळे त्यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गेल्यावेळी भारती पवार यांना महिला खासदार म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली होती. यावेळी रक्षा खडसे यांना संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे कोणते खाते असणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

ADVERTISEMENT

शिवसेनेचे प्रतापराव जाधव होणार मंत्री

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन मंत्रि‍पदे मिळणार आहेत. यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असणार आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून प्रतापराव जाधव हे शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदेंकडून त्यांचे नाव सुचवण्यात आले होते. त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोनही आला आहे. 

रामदास आठवले घेणार मंत्रि‍पदाची शपथ

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरपीआयचे नेते रामदास आठवले सलग तिसऱ्यांदा मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की त्यांचाही मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामदास आठवले हे केंद्रीय राज्य मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT