Prakash Ambedkar : मविआ 'वंचित'ला देणार 'इतक्या' जागा; चेंडू ठाकरे-पवारांच्या कोर्टात
Prakash Ambedkar, Vanchit-MVA seat Sharing : . प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे. वंचितचा हा प्रस्ताव पुर्ण करण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. आता प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव पवारांनी आणि ठाकरेंनी मान्य करावा, असे आमचे मतं असल्याचे नाना पटोले यांना सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar, Vanchit-MVA seat Sharing : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीत समावेश होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी दिलेला 6 जागांचा प्रस्ताव काँग्रेसने स्विकारला असल्याची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे वंचितचा मविआत सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान वंचितच्या या प्रस्तावाला अद्याप काँग्रेसकडूनच ग्रीन सिग्नल मिळाला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया समोर आली नाही आहे. त्यामुळे ठाकरे-पवार काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (prakash ambedkar vanchit bahujan aghadi mahavikas aghadi lok sabha seat sharing nana patole sharad pawar udhhav thackeray maharashtra politics)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. यासाठी सुरूवातीला महाविकास आघाडीकडून वंचितसाठी दोन जागा सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यावेळी वंचित आणि शिवसेनेची युती असल्याने या जागा शिवसेनेच्या वाट्यातून दिल्या जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर वंचितसमोर 4 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र या प्रस्तावावर देखील काहीच एकमत झाले नव्हते.
हे ही वाचा : अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?
आज वंचितने महाविकास आघाडीसमोर 6 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला आता काँग्रेसला मान्य असल्याची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठी प्रतिक्रिया देताना याबाबतची माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे. वंचितचा हा प्रस्ताव पुर्ण करण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. आता प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव पवारांनी आणि ठाकरेंनी मान्य करावा, असे आमचे मतं असल्याचे नाना पटोले यांना सांगितले आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत राहतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान वंचितने महाविकास आघाडीसमोर 6 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी 2 जागा सोडणार असल्याची माहिती आहे. या प्रस्वावावर महाविकास आघाडीत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर आता वंचितच्या महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला मोठा झटका! माजी आमदाराने सोडली साथ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT