PM Modi : "काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर", मोदींवर गांधींसह विरोधक संतापले
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील एका मुद्द्यावर बोट ठेवलं. सर्वांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून, ती एकत्रित करून मुस्लिमांना वाटायची आहे, असे मोदी म्हणाले. त्यांच्या याच विधानावरून आता वाद उभा राहिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींची टीका
राहुल गांधींनी दिले प्रत्युत्तर
असदुद्दीन ओवेसीची पंतप्रधान मोदींवर टीका
PM Modi On Congress Manifesto Property Distribution : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधक चांगलेच संतापले. पंतप्रधान मोदींची राजस्थानमधील बांसवाडा येथे सभा झाली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विधानाशी या जाहीरनाम्यातील घोषणाचा संबंध लावत मोदी म्हणाले की, 'काँग्रेस सत्तेत आल्यास सगळ्यांच्या संपत्तींचा सर्वेक्षण केले जाईल आणि ही संपत्ती ते मुस्लिमांना वाटणार.' यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले असून, मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. (uproar over pm modi's Remarks about distribution of property in congress manifesto)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस अर्बन नक्षल्यांच्या हातात गेली आहे, असे त्यांचेच लोक सांगत आहेत, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील देशातील सर्व संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे समान वाटप करण्याबद्दलच्या मुद्द्यावर मोदींनी भाष्य केले.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
भाषणात मोदी म्हणाले की, "यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसने जाहीरनाम्यात जे सांगितलं आहे, ते चिंताजनक आहे. गंभीर आहे. आणि हा माओवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर काँग्रेसचे सरकार आले, तर प्रत्येकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या बहिणींकडे किती सोने आहे, ते तपासलं जाईल. त्याचा हिशोब केला जाईल."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
"आदिवासी कुटुंबाकडे चांदी असते, त्याचा हिशोब केला जाईल. सरकारी नोकरदारांकडे किती संपत्ती आहे, त्याची चौकशी केली जाईल. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं आहे की, बहिणींकडचे जे सोने आहे आणि इतर जी संपत्ती, ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल."
हेही वाचा >> "मुलाला पुढे आणण्यासाठी ठाकरेंना घरात कोंडून ठेवलं", सरवणकरांचे रश्मी ठाकरेंबद्दल खळबळजनक विधान
"माता भगिनींच्या आयुष्यात सोने दाखवण्यासाठी नसते. ते स्वाभिमानाशी जोडलेले आहे. तिचे मंगळसूत्र फक्त सोन्याच्या किंमतीचा मुद्दा नाहीये. तिच्या जीवनाच्या स्वप्नाशी जोडलेला मुद्दा आहे. तुम्ही ते हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहात, जाहीरनाम्यात."
ADVERTISEMENT
"सोने घेऊन टाकू आणि सगळ्यांना वाटून टाकू. आणि पूर्वी जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ही संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार. घुसखोरांना वाटणार. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, हे तुम्हाला हे मान्य आहे का?", असा सवाल मोदींनी उपस्थितांना केला होता.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "मतदानाच्या पहिल्या टप्प्यात हाती निराशा आल्यानंतर, नरेंद्र मोदींच्या खोटे बोलण्याची पातळी इतकी घसरली आहे की, ते आता लोकांना मुद्द्यांपासून भटकवू पाहत आहेत."
हेही वाचा >> "संपलाय ना उद्धव ठाकरे, मग का...", थेट मोदींना सवाल
राहुल गांधी म्हणाले की, "काँग्रेसच्या क्रांतिकारी जाहीरनाम्याला प्रचंड पाठिंबा मिळू लागला आहे. देश आता आपल्या मुद्द्यांवर मतदान करेल. त्यांच्या नोकरीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मतदान करेल. भारताची आता दिशाभूल होणार नाही", असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिले.
काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबरच इंडिया आघाडीतील नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या विधानावरून टीका केली आहे.
ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान मोदी आज मुस्लिमांना घुसखोर म्हणाले आणि आणि म्हणाले की, त्यांना जास्त मुले असतात. 2002 पासून आत्तापर्यंत मोदींची एकच हमी आहे; भारतातील मुस्लिमांना शिव्या द्या आणि मते मिळवा."
"देशाच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मोदी सरकारमध्ये देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क त्यांच्या अब्जाधीश मित्रांचा आहे. आज भारतातील 1% लोकांनी देशाची 40% संपत्ती खाल्ली आहे. सामान्य हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवली जात आहे, पण सत्य हे आहे की तुमच्या पैशाने आणखी कोणीतरी श्रीमंत होत आहे", अशा शब्दात ओवेसींनी मोदींना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT