Bigg Boss 18 : डंके की चोट पे...गुणरत्न सदावर्ते पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss 18 gunaratna sadavarte exit the show what was the reaso behinde maratha reservation salman khan
सदावर्ते पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मी इलिमिनेट झालो नाही आहे

point

मला बिग बॉसच्या घरातून काढलं देखील नाही

point

मग सदावर्ते घरातून बाहेर का पडलं?

Gunaratna Sadavarte News : बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनमध्ये सहभागी झालेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून अचानक एक्झिट झाली होती. आरक्षणाच्या एका सुनावणीसाठी सदावर्ते हे घराबाहेर पडल्याची माहिती होती. त्यामुळे नेमकी केस कोणती आहे? आणि सदावर्ते पुन्हा घरात परतणार का? हे जाणून घेऊयात. (bigg boss 18 gunaratna sadavarte exit the show what was the reaso behinde maratha reservation salman khan)  

ADVERTISEMENT

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई तकने मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घराबाहेर पडण्यामागचं महत्वाचं कारण सांगितलं आहे. ''जेव्हा कोर्टाचं बोलावण येतं तेव्हा सगळ्यांना जावं लागतं. खूप मोठी केस होती. जयश्री या केसमध्ये याचिकाकर्ता राहिली आहे. आता नवीन पद्धतीने आरक्षणाच्या सुनावणीवर मुख्य न्यायमुर्तींच्या फुल बेंचसमोर सुनावणी होती. ही गोष्ट कलर्स आला आधीपासूनच माहीती होती. तसेच मी आधीच त्यांच्याशी याबाबत बोललो होतो. त्यामुळे मला घराबाहेर यावं लागलं असे सदावर्ते सांगतात. 

हे ही वाचा : Atul Parchure Death : 'डॉक्टरांनी केलेले चुकीचे उपचार', अतुल परचुरेंसोबत नेमकं काय घडलेलं?

तसेच 'मी इलिमिनेट झालो नाही आहे. मला बिग बॉसमधून काढण्यात आलं आहेत, अशा चर्चा होतायत. पण या चर्चेंमध्ये काही एक तथ्य नाही आहे. मला कोर्टाने बोलावलं होते. आरक्षणासंबंधीत केस होती यासाठी मी घराबाहेर पडलो आहे, आणि आजही मला बिग बॉसच्या घरात जाण्यात काहीच अडचण नाही आहे, असे सांगत सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात परतण्याचेही संकेत दिले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान गेल्या आठवड्यात बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनचा पहिलाच आठवडा पार पडला होता. या पहिल्या आठवड्यात कोणत्याच सदस्याला घराबाहेर काढले नव्हते. त्याऐवजी घरात बांधलेल्या गाढवाची शोमधून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांची शोमधून अचानक एक्झिट घेतलेली.

कोर्टाने सदावर्तेंना झापलं 

डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आलीये. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Video : "मला सरकार आणि दाऊद इब्राहिम घाबरतो ...",Bigg Boss च्या घरात गुणरत्न सदावर्ते का भडकले?

मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT