Shahrukh Khan Death Threat : सलमाननंतर आता 'शाहरूख'ला जीवे मारण्याची धमकी, नेमकी मागणी काय?
Shah Rukh Khan Death Threat : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या दबंग खानला म्हणजेच सलमानला सातत्याने धमकीचे कॉल आणि मेल येत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे. यादरम्यान आता सुपरस्टार किंग खानलाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जीवे मारण्याची धमकी! नेमकी मागणी काय?
शाहरुखची सुरक्षा वाढवणार?
Shah Rukh Khan Death Threat : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या दबंग खानला म्हणजेच सलमानला सातत्याने धमकीचे कॉल आणि मेल येत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे. यादरम्यान आता सुपरस्टार किंग खानलाही(King Khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो रायपूरचा(Raipur) असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे. (shah rukh khan gets death threat from raipur salman khan lawrence bishnoi gang)
ADVERTISEMENT
जीवे मारण्याची धमकी! नेमकी मागणी काय?
Demand From Shah Rukh Khan: मुंबई पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे एक पथक रायपूरला रवाना झाले आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल. वांद्रे पोलीस ठाण्यात शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, 'शाहरुख खानला जीव वाचवायचा असेल तर करोडो रुपये द्यावे लागतील. अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.' त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव फैजान खान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फोन बंद केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : झुळूक वाऱ्याची अन् चाहुल थंडीची! तुमच्या शहरात आज कसंय वातावरण?
मुंबई पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची नोंद घेतली. आरोपीवर भारतीय न्याय संहितेची कलम 308(4) आणि 351(3)(4) लावण्यात आले आहे. आरोपीला लवकरच पकडले जाईल, असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या धमकीच्या फोननंतर इंडस्ट्रीत भीतीचे वातावरण आहे. याआधीही सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानला सातत्याने धमक्या येत आहेत. गेल्या महिन्यात सलमानचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती.
शाहरुखची सुरक्षा वाढवणार?
Shah Rukh Khan Security Tight: या सर्व घटनेनंतर आता शाहरुख खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. मन्नतच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीही पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले होते. शाहरुखच्या बाजूने अद्याप अतिरिक्त सुरक्षेची मागणी करण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT