Pushpa 2 Records : अल्लू अर्जुनच्या अटकेचा पुष्पा-2 चित्रपटाला फायदा की तोटा? काय सांगतात समोर आलेले आकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुष्पा 2 चित्रपटाने सर्व रेकॉर्डस् तोडले

point

अल्लू अर्जुनच्या अटकेचा फायदा की तोटा?

point

किती झाली चित्रपटाची कमाई?

Pushpa 2 Allu Arjun Arrest Case : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी पुष्पा 2 च्या वर्ल्डवाइड कलेक्शनने 1400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या अटकेमुळे चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं मानलं जात होतं. पण चित्रपटाच्या यशाचं गणित जरा वेगळं आहे.

ADVERTISEMENT

13 डिसेंबर रोजी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र, रात्रभर तुरूंगात काढल्यानंतर अल्लु अर्जुनची सुटका करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घसरण होईल, असं म्हटलं जात होतं. मात् समोर आलेले आकडे जरा वेगळेच आहेत. अल्लूच्या अटकेनंतर आणि सुटकेनंतर आलेल्या नवीन आकडेवारीनुसार, या घटनेचा चित्रपटाला आणखी फायदा झाल्याचं बोललं जातं आहे. चित्रपटाची पकड ढिली झाली नसून, प्रेक्षकांच्या पसंतीत चांगलीच वाढ झाली आहे.


हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले

हे वाचलं का?

 

'इंडिया टुडे'शी बोलताना मार्केटिंग एक्सपर्ट रमेश बाला म्हणाले, "होय, अटकेमुळे चित्रपटाची कमाई वाढल्याची चर्चा आहे. अटकेनंतर चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. अटकेची वेळ ही वीकेंडच्या सुरूवातीची वेळ होती. कदाचित याचाही कमाईसाठी मोठा फायदा झाला. कोणतीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी असते, अगदी वाईट प्रसिद्धी देखील चांगलीच असते. लोकांमध्ये या घटनेबद्दल उत्सुकता होती, त्यामुळे काही लोकांना चित्रपट पाहण्यासाठी इंटरेस्ट वाटला असावा. त्यामुळेच वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?



पुष्पा 2 चा प्रेक्षकांच्या भावनांवर अल्लु अर्जुनच्या अटकेचा फारसा परिणाम झाला नाही. उलट लोकांना त्याच्याबद्दल सहानुभूतीच निर्माण झाली. अल्लू अर्जुनबद्दल अनेकांना सहानुभूती आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला तो थेट जबाबदार नसतानाही त्यांनी पीडित कुटुंबाला भरपाई जाहीर केली. गर्दी वाढणं आणि चेंगराचेंगरी होणं हे अपघाती होतं, हेतुपुरस्कर नव्हतं. त्यामुळेच प्रेक्षक या चित्रपटावर बहिष्कार घालत नाहीयेत किंवा अल्लू अर्जुनला यासाठी दोष देत नाहीयेत. 

मार्केट एक्सपर्टस् म्हणतात, चित्रपटाचा रन रेट भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त आहे. हा चित्रपट दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवतोय. आता जे काही कलेक्शन आहे, ते बोनस आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलं आहे. पुष्पा-2 ने तिसऱ्या वीकेंडमध्ये प्रवेश केलाय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT