जिंदगी गोलगप्पे जैसे होती है,आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आमीर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.आयपीएलच्या अंतिम सामन्यात आमिरने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांसमोर आणला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.आमीर खान आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात झळकणार आहे.दोन मिनिट ४५ सेकंदांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला,आमिर खान लाल सिंह चड्ढाच्या भूमिकेत ट्रेनमध्ये बसून त्याची कथा सांगत आहे. लहानपणी लालसिंह चड्डा यांना चालता येत नव्हते. याशिवाय तो मानसिकदृष्ट्याही थोडा कमजोर होता.त्याच वेळी त्याची आई त्याल सतत प्रोत्साहन देते की तो कोणापेक्षा कमी नाही. तो एक यशस्वी अॅथलीट,सैनिक आणि शेवटी एक यशस्वी माणूस कसा बनतो हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये करीना कपूरची झलकही दाखवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

लाल सिंह चड्ढा या चित्रपटात मोना सिंगने आमीर खानच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय नागा चैतन्य या चित्रपटात लाल सिंह चड्ढा यांच्या खास मित्राची भूमिका साकारत आहे, जो त्याच्यासोबत लष्करात आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 1994 मध्ये आलेल्या फॉरेस्ट ग्रंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. फॉरेस्ट ग्रूपमध्ये टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन लाल सिंह चड्ढा दिग्दर्शित करत आहेत.लाल सिंह चड्ढा या सिनेमाची घोषणा आमिर खानने 2019 मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त केली होती. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार होता. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेत सतत पुढे ढकलण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT