नितीन देसाईंची पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदेंना विनंती; 11 ऑडिओ क्लिपमध्ये काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

nitin desai record 11 audio clips before commit suicide. desai request prime minister, chief minister about nd studio.
nitin desai record 11 audio clips before commit suicide. desai request prime minister, chief minister about nd studio.
social share
google news

Nitin Desai News : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. नितीन देसाई यांच्या अकाली एक्झिटनंतर असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तब्बल 11 ऑडिओ रेकॉर्ड केल्या. रेकॉर्डमध्ये त्यांनी एनडी स्टुडिओ, कर्ज प्रकरणाबद्दल म्हणणं मांडलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती केली आहे.

ADVERTISEMENT

कर्जत-खालापूरमध्ये 2005 मध्ये उभारलेल्या भव्य दिव्य एनडी स्टुटिओत नितीन चंद्रकांत देसाई यांनी जगाचा निरोप घेतला. नितीन देसाईंची आत्महत्या सिनेसृष्टीच्या मनाला चटका लावून गेली. देसाई यांच्या आत्महत्येनंतर काही गोष्टी समोर आल्या असून, यात कर्जाचा मुद्दा प्रामुख्याने सांगितला जात आहे.

नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे?

नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी एनडी स्टुडिओतून ताब्यात घेतला. त्यानंतर बुधवारी (2 ऑगस्ट) त्यांचा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. चार डॉक्टरांच्या पथकाने नितीन देसाईंच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले. गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

हे वाचलं का?

वाचा >> Nitin Desai: मध्यरात्र.. ND स्टुडिओ अन् आत्महत्या.. नेमकं काय घडलं?

आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंच्या 11 ऑडिओ क्लिप

नितीन देसाई हे मंगळवारी (1 ऑगस्ट) रात्री 10 वाजता स्टुडिओतील रुममध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आता समोर आलेल्या माहितीनुसार नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे की, या ऑडिओ क्लिप त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि वकिलाला पाठवल्या होत्या. देसाई यांनी त्यांचा सहायक योगेश ठाकूर यांना या ऑडिओ क्लिप वकिलांना पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार वकील वृंदा विचारे यांना ठाकूर यांनी ऑडिओ क्लिप पाठवल्याचे समजते.

वाचा >> नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, ‘ते’ प्रकरण काय?

Nitin Desai Suicide : 11 ऑडिओ क्लिपमध्ये काय?

नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये 4 उद्योजकांची नावे आहेत. त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक फसवणूक केली आणि छळ केला, असे नितीन देसाईंनी या क्लिपमध्ये नमूद केलेले आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Nitin Desai: नि:शब्द शोकांतिका! धनुष्यबाण बनवला अन् मधोमध उभं राहून घेतला गळफास

एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे जाणार आहे. त्याला नितीन देसाई यांनी विरोध केला असून, एनडी स्टुडिओचा ताबा सरकारने घ्यावा, अशी विनंती त्यांनी ऑडिओ क्लिपमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT