Nitin Desai: मध्यरात्र.. ND स्टुडिओ अन् आत्महत्या.. नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. वाचा या संपूर्ण घटनेची क्रोनोलॉजी काय आहे.
ADVERTISEMENT
Nitin Desai Suicide: कर्जत: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी (Nitin Desai) घेतलेल्या अकाली एक्झिटने कला रसिकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाईंची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) अशी बातमी 2 ऑगस्टच्या सकाळी कानावर आली आणि सगळेच स्तब्ध झाले. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) देसाईंनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रक्ताचं पाणी करून जो एनडी स्टुडिओ त्यांनी उभा केला होता. त्याच स्टुडिओमध्ये देसाईंनी त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम दिल्यानं अवघी सिनेसृष्टी हळहळली. या सगळ्या घटनेबद्दल आता पोलिसांनी माहिती दिली आहे. 1 ऑगस्टच्या रात्री आणि आत्महत्येवेळी काय झालं, हेच आपण जाणून घेऊया… (nitin desai suicide chronology of this entire incident in nd studio karjat latest update bollywood)
ADVERTISEMENT
‘लगान’, ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘रंगीला’ अशा असंख्य हिंदी मराठी चित्रपटाचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं होतं. नितीन देसाईंच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जत येथे उभारलेल्या ND STUDIOS मध्येच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
हे ही वाचा >> Nitin Desai Suicide: बॉलिवूडला आपलंस करणारा कलाकार, कोण होते नितीन देसाई?
या घटनेसंदर्भात कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता नितीन देसाई त्यांच्या रूममध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला सकाळी उशिरापर्यंत रुममधून बाहेर आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या रूमचा दरवाजा त्यांच्या बॉडीगार्ड आणि इतर काही लोकांनी वाजवला.
हे वाचलं का?
दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे बॉडीगार्डने रूमला असलेल्या खिडकीमधून आत बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नितीन देसाईंचा मृतदेह त्यांच्या रूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये होता. हे पाहून सगळेच हादरले.
यानंतर पोलिसांना या सगळ्या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेत देसाईंची मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देण्यात आला.
ADVERTISEMENT
नितीन देसाई मध्यरात्री पोहचले कर्जतला अन्..
नितीन देसाई यांनी काल व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये त्यांनी वेगवेगळे व्हॉईस नोट रेकॉर्ड करून ठेवले आहेत. यामध्ये चार उद्योजकांचा देखील उल्लेख त्यांनी केला असल्याचं समजतं आहे. काल रात्री 12 वाजता नितीन देसाई हे दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहचले. तिथून ते गाडीने थेट कर्जतच्या आपल्या एनडी स्टुडिओमध्ये साधारण पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोहचले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Nitin Desai Suicide अन् Audio क्लिप… ‘ते’ 4 उद्योजक कोण?, Inside स्टोरी
इथे आल्यानंतर त्यांनी स्टुडिओतील मॅनेजरशी बोलणं केलं आणि त्याला सांगितलं की, मी तुला सकाळी एक व्हॉइस रेकॉर्डर देईन. तो व्हॉईस रेकॉर्डर तू संबंधित लोकांना दे. सकाळी उठल्यानंतर त्याने आधी नितीन देसाई यांचा शोध घेतला.
पण ते त्यांच्या रूममध्ये नव्हते. त्यानंतर तो मेगा हॉलच्या परिसरात गेला. जिथे त्याला नितीन देसाई हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तिथेच त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर ठेवला होता. ज्याचा उल्लेख देसाईंनी आपल्या मॅनेजरकडे केला होता. तो व्हॉईस रेकॉर्डर आता पोलिसांकडे जमा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT