Gautami Patil Pune : गौतमीनं आधी चप्पल काढली, मग शिवराय आणि शंभूराजेंवरील कादंबरी हातात घेतली...
गौतमी पाटील लेखक नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशनच्या स्टॉलला भेट द्यायला गेली होती. यावेळी दिग्दर्शक प्रविण तरडेही तिथे उपस्थित होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गौतमी पाटील पुणे बूक फेस्टीव्हलमध्ये...
गौतमीच्या 'या' गोष्टीचं सगळ्यांकडूनच होतंय कौतुक
पुण्यात सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती पुणे बूक फेस्टीव्हलची. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या फेस्टीव्हलसाठी अनेक दिग्गज अभिनेते, कलाकार, सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरची गर्दी होताना दिसतेय. पुस्तकं घेण्यासाठी अनेक लोक इथं येताना दिसत आहेत. मात्र या सगळ्या गर्दीचं लक्ष वेधलं लाडक्या गौतमी पाटीलने. काल गौतमी पाटीलनेही या बूक फेस्टीव्हलला गौतमीनेही हजेरी लावली. यावेळी गौतमी पाटीलने केलेल्या एका गोष्टीचं सगळ्यांकडूनच कौतुक होतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shiv Sena Portfolio list: भाजपने शिंदेंना गृह खातं दिलंच नाही, शिवसेनेला नेमकं काय-काय मिळालं?
गौतमी पाटील लेखक नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशनच्या स्टॉलला भेट द्यायला गेली होती. यावेळी दिग्दर्शक प्रविण तरडेही तिथे उपस्थित होते. गौतमीला तिथे तिला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची साधू आणि शंभू अशा दोन कादंबरी भेट देण्यात आल्या. यावेळी या कादंबऱ्या हातात घेण्यापूर्वी गौतमीने लगेचच पायातली चप्पल काढली. हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात, फोनमध्ये टिपला. तिच्या या कृत्याचं सर्वांकडूनच कौतुक होताना दिसतंय.
एरवी उद्घाटन, वाढदिवस, मिरवणुका अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मला नाचालयला बोलवलं जातं, मात्र पहिल्यांदा मला वाचायवा बोलावलं याचा मला आनंद वाटला असं गौतमी म्हणाली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
सोशल मिडियावर गौतमीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यावर तिचं कौतुक होतंय आणि लोकांना गौतमीची एक वेगळी बाजू पाहून आनंदही होतोय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT