'सरकारकडे काही मागू नका, आता सरकार कोणतं...' शेतकरी आंदोलनावरून नाना पाटेकर संतापले
गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे काही मागायची वेळ नाही तर आता देशात कोणतं सरकार आणायचं हे शेतकऱ्यांनी ठरवण्याची आता वेळ आली आहे असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'शेतकऱ्यांनी आता सरकार कोणाचे आणायचे हे ठरवा'
सरकारकडे काही मागू नका, तर सरकार कोणाचे आणू ते ठरवा
Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीही उडी टाकली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाविषयी त्यांनी मोठं विधान केले आहे. नाना पाटेकर यांनी सरकावर निशाणा साधत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारविषयी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आता आपल्याला जे पाहिजे ते सरकार निवडून द्यायची वेळ आली आहे. कारण शेतकऱ्यांनी आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
आता मागायची वेळ नाही
शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी नाना पाटेकर म्हणतात की, 'शेतकऱ्यांनी आता काही मागायची ही वेळ नाही तर आता देशात सरकार कोणतं आणायचं हे आता ठरवण्याची वेळ आली आहे असा संताप व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्..., क्षणात चिमुकल्याचा जीवच गेला
अभिनेता नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, तर आता मात्र नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत 'पूर्वी 80 ते 90 टक्के शेतकरी होते, तर तो आकडा बदलून फक्त 50 टक्के शेतकरी झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागू नये. तर आता त्यांनी आपल्याला कोणाचे सरकार पाहिजे ते त्यांनी सरकार आणावे असा सल्लाच त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
यावेळी त्यांनी राजकीय प्रवेशाविषयीही बोलले आहेत, त्यांनी म्हटले आहे की, मी आता राजकारणात जाऊ शकत नाही. कारण माझ्या पोटात म्हणजेच माझ्या मनात असलेलं माझ्या ओठावर येईल आणि राजकीय पक्षातून माझी हकालपट्टी केली जातील असंही त्यांनी उपरोधिकपणे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
सरकारची पर्वा का करा
माझी हकालपट्टी केल्यानंतर महिन्याभरातच सगळं पक्ष संपूनही जातील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मात्र आज मी इथं शेतकऱ्यांसमोर, माझ्या शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो. आम्हाला अन्न देणाऱ्याच्या शेतकरी बांधवांची कोणाला पर्वा नसेल तर आम्ही सरकारची तर का पर्वा करा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
नाना पाटेकर यांनी सातत्याने शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे, यावेळीही त्यांनी सरकारला सुनावत शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना म्हणजेच त्यांच्या 180 विधवा पत्नींना त्यांनी 15-15 हजार रुपयांची मदत केली होती.
हे ही वाचा >>कार्यकर्त्याच्या 'त्या' एका कृतीमुळे मोदी झाले भावूक, जुळ्या बाळांच्या बापासाठी पंतप्रधानांची पोस्ट
ADVERTISEMENT