Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!

मुंबई तक

Ashish Vidyarthi Second Wife: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी याने वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. जाणून घ्या त्याचं मन जिंकणारी रुपाली बरुआ आहे तरी कोण. नेमकं करते तरी काय?

ADVERTISEMENT

who is ashish vidyarthi second wife rupali baruah know everything about this of assam
who is ashish vidyarthi second wife rupali baruah know everything about this of assam
social share
google news

Ashish Vidyarthi Second Wife: मुंबई: बॉलिवूडपासून साऊथपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारा लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) याने वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. आसाममधील रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत त्याने कोर्ट मॅरेज केलं आहे. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आशिष विद्यार्थ्याचे मन जिंकणारी रुपाली बरुआ कोण आहे हे जाणून घेण्याचीही उत्सुकता निर्माण झाली.

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. वयाच्या 60व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी खूपच दिसला. कोण आहे रुपाली बरुआ आणि आशिष विद्यार्थी तिला कसा भेटला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर…

आशिष विद्यार्थीची दुसरी पत्नी रुपाली बरुआ कोण आहे?

रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहे. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. रुपाली बरुआ ही बुटीक आणि कॅफे चालवते.

हे ही वाचा >> ‘भाजप सत्तेत आलं नाही तर केंद्राच्या…’, अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

रुपाली बरुआने तिच्या दोन मैत्रिणी मेघाली आणि नमिता यांच्यासोबत कोलकातामध्ये नेमग (Nameg) नावाचे बुटीक आणि नरुमेग (Narumeg) नावाचे कॅफे सुरू केले आहे. हे 32 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

कशी झाली होती आशिष आणि रुपालीची भेट?

रुपाली बरुआ आणि आशिष विद्यार्थी यांना जेव्हा विचारण्यात आले की, त्यांची पहिली भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले? तर आशिषने सांगितले की ही एक मोठी कथा आहे आणि तो त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी सांगेन. दुसरीकडे रुपाली बरुआने सांगितले की, ती आणि आशिष विद्यार्थी काही महिन्यांपूर्वी भेटले होते आणि त्यांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा >> Akash Madhwal :MIचं सेमी फायनलचं तिकीट कापणारा आकाश माधवाल कोण?

आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी कोण?

आशिष विद्यार्थीने पहिले लग्न अभिनेत्री पीलू विद्यार्थी हिच्याशी केले होते. दोघांनाही एक मुलगा आहे, ज्याचं नाव अर्थ विद्यार्थी आहे. पीलू विद्यार्थीचे पहिले नाव राजोशी बरुआ आहे. ती एक अभिनेत्री आणि गायिका देखील आहे.

आशिष विद्यार्थ्याचा मुलगा काय करतो?

आशिष विद्यार्थी केवळ अभिनेताच नाही तर YouTuber देखील आहे. त्याने आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, मुलाला अभिनयात अजिबात रस नाही. त्याच्या मुलाला गणितात रस आहे आणि त्याला त्यात पुढे करिअर करायचे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp