Apple iPhone 17 ला मिळणार कुलिंग चेंबर, काय आहे हे भन्नाट फिचर?

मुंबई तक

सध्याच्या आयफोन 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्ससह, कंपनीने उष्णता व्यवस्थापनासाठी आणि हँडसेटला जास्त गरम होण्यापासून वाचवण्यासाठी ग्राफीन शीटचा वापर केला आहे. प्रो सीरीजमध्ये हीटिंग कंट्रोल सिस्टम उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

या वर्षी लॉन्च होणार Apple iPhone 17 सिरीज

point

iPhone 17 Pro आणि 17 Pro Max मध्ये लिक्विड कूलिंग

point

फोन गरम हेण्यापासून कसा वाचणार?

Apple iPhone 17 सीरीज या वर्षी लॉन्च होणार आहे.लॉन्च होण्यापूर्वी, या सिरीजबद्दलची बरीच माहिती लिक झाली आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये या सीरीजचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. या सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे ती कूलिंग सिस्टमची.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की iPhone 17 Pro आणि 17 Pro Max ला लिक्विड कूलिंग मिळणार आहे, त्यामुळे थर्मल कूलिंग सिस्टीम मिळणार आहे. 

हे ही वाचा >> Mumbai : होळीला फुलं आणायला निघालेला तरूण घरी परतलाच नाही... रस्त्यात बसच्या धडकेत मृत्यू, मित्रही गंभीर

सध्याच्या आयफोन 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्ससह, कंपनीने उष्णता व्यवस्थापनासाठी आणि हँडसेटला जास्त गरम होण्यापासून वाचवण्यासाठी ग्राफीन शीटचा वापर केला आहे. प्रो सीरीजमध्ये हीटिंग कंट्रोल सिस्टम उपलब्ध आहे. पण काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावर्षी iPhone 17 सीरीजच्या सर्व हँडसेटमध्ये कूलिंग सिस्टम असेल. 

लिक्विड कूलिंग कसे कार्य करते?

आयफोन किंवा इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हार्डवेअर असतात. ते जास्त वापरल्यास उष्णता निर्माण व्हायला सुरूवात होते. ही उष्णता नियंत्रित न केल्यास, मोबाईल स्लो होऊ शकतो आणि बॅटरी लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे मोबाई कंपन्या उष्णता-कमी करणारी यंत्रणा बसवतात.

ही उष्णता नष्ट करणारी सिस्टिम गेमिंग किंवा व्हिडिओ एडीटींगसारख्या जास्त लोड असलेल्या कामांदरम्यान निर्माण होणारी उष्णता नियंत्रित करते. स्मार्टफोनची कूलिंग सिस्टीम आधीसारखी वॉटर कूलिंग (पीसी प्रमाणे) नाही, पण एक नवं कूलिंग तंत्रज्ञान आहे.

हे ही वाचा >> Personal Finance: जर क्रेडिट कार्ड धडाधड वापरलं अन्.. पाहा तुमचा कसा होऊ शकतो टप्प्यात कार्यक्रम

स्मार्टफोनच्या आत, एक पातळ तांब्याचा हीट पाईप किंवा वाफ चेंबर असेल, जे खूप कमी प्रमाणात द्रव (पाणी किंवा कोणतेही विशेष शीतलक द्रव) भरलेलं असेल. जेव्हा फोन गरम होईल, तेव्हा हे द्रव उष्णता शोषून घेतं आणि त्याचं गॅसमध्ये रूपांतर करतं. यानंतर हा गरम वायू फोनच्या थंड भागाकडे जातो. यानंतर, तिथे उष्णता सोडतं आणि पुन्हा द्रवात रूपांतरित होऊन पुन्हा आधीच्या स्थितीत येतं. एकूणच या प्रक्रियेमुळे  फोन गरम होण्याचं प्रमाण हे एकदमच कमी होईल अशी शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp