Ladki Bahin Yojana : 'या' महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही, कारण...
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अर्ज करून काहीच फायदा होणार नाही
या महिलांना योजनेचे पैसेच मिळणार नाही
या कारणामुळे महिलांना योजनेचे पैसे येणार नाही
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही? या महिला नेमक्या कोण असणार आहेत? आणि योजनेचा एकही पैसा या महिलांना का मिळणार नाही? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme these women cant get benefit of 1500 amount of mukhymantri majhi ladki bahin yojana aditi tatkare ajit pawar cm eknath shinde)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये 3000 जमा झाले होते. त्या महिलांना आता 1500 रूपये मिळाले आहेत. तसेच ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज करूनही एकही रूपया मिळाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर आता चौथा हप्ता ऑक्टोबरमध्येच जमा होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची 'ती' चूक...
पण असे असले तरी काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीयेत. कारण माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने काही नियम आणि पात्रता निश्चित केल्या आहेत. त्यानुसार ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहे, त्यांना या योजनेचा एकही रूपया मिळणार नाही.
हे वाचलं का?
कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नियमित, कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंडळ, महामंडळ, मंडळ किंवा उपक्रमाची अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असावी. किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टरशिवाय चारचाकी वाहन आहे. किंवा महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.
हे ही वाचा : Ladka Bhau Yojana : दर महिन्याला 10 हजार मिळणार! लाडक्या भावांनो, कसा कराल अर्ज, योजनेच्या अटी काय?
चौथा हप्ता कधी मिळणार?
10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT