एग्जिट पोल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधीच महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme third installment deposite women account is your name on this list
4500 खात्यात झाले डिपॉझिट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात जमा होणार चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची एकत्रित रक्कम

point

महिलांच्या खात्यात 4500 नंतर लगेचच जमा होतील 3000 रुपये, पण...

point

...तरच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे होतील जमा

Mazi Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2 कोटी पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रुपये डिपॉझिट झाले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही. परंतु, ज्या महिलांना 4500 रुपये मिळाले आहेत, त्यांच्या खात्यात काही दिवसांमध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. कारण सरकारने चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची एकत्रित रक्कम 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. (the money of the third installment has been deposited in the accounts of nearly 2 crore eligible women)

ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. पण आता ऑक्टोबरमध्ये याच महिलांच्या खात्यात चौथा हफ्ता जमा होणार आहे. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधानसभा निवडणूक येऊ घातली असतानाच महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यातील हफ्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले जातील, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होतील, असं कळते आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mumbai Fire Incident: मुंबईत आगडोंब! चेंबुर परिसरात भीषण आग, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

...तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होईल

"मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दिड हजार रुपयांचे मोल कसे कळणार? असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर टीका केली. तसेच भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला. भोईर कल्याण पश्चिमच्या शिवसेनेकडून आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती. 

हे ही वाचा >>  Exit Poll Result : हरियाणा, काश्मीरात भाजप सत्तेबाहेर, महाराष्ट्रात काय होणार?

तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील. इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचं भोईर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.  दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील "अनाथांचा नाथ एकनाथ " या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT