Majhi Ladki Bahin Yojana: अर्ज भरलेल्या महिलांसाठी मोठी बातमी, सरकारचा 'तो' निर्णय अन्...

मुंबई तक

Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय देण्यात आले होते. या पर्यायातील ऑफलाईनमधील एका अटीत सरकारने मोठी सुट दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे

ADVERTISEMENT

ऑफलाईनमधील एका अटीत सरकारने मोठी सुट दिली आहे.
majhi ladki bahin yojana big relief for offline register women ajit pawar eknath shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना दिलासा

point

सरकारने अर्जदार महिलांना दिली ही सुट

point

अर्जदार महिलांची पायपीट वाचणार

Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्यसरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये खात्यात येणार आहेत.  या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय देण्यात आले होते. या पर्यायातील ऑफलाईनमधील एका अटीत सरकारने मोठी सुट दिली आहे. त्यामुळे महिलांना (Majhi Ladki Bahin Yojana Scheme)  मोठा दिलासा मिळणार आहे. (majhi ladki bahin yojana big relief for offline register women ajit pawar eknath shinde)  

खरं तर नारीशक्ती दुत अँपवर थेट फोटो काढण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. विशेष म्हणजे फोटोवरचा फोटो काढायचा नाही. तुम्हाला अर्ज करतानाचा फोटो काढायचा आहे.

हे ही वाचा : Jitesh Antapurkar : काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

 त्यामुळे नारीशक्ती दुत अँपमधील या पर्यायाने ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचे फोटो नेमके कसे अपलोड करायचे असा प्रश्न होता. कारण ग्रामीण भागातील महिलांनी असंख्य महिलांनी ऑफलाईन अर्ज केले होते. त्यामुळे एकतर या महिलांना ऑनलाईन फॉर्म
भरताना पुन्हा कार्यालतात बोलावून फोटो काढावे लागणार होते. त्यामुळे पुन्हा सरकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जावरील फोटोच ग्राह्य धरण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. 

खात्यात पैसै कधी जमा होणार?

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

हे ही वाचा : Supriya Sule : "शरद पवार कोण आहेत, हे एकदा ठरवा", सुळेंचा शाहांवर हल्ला

हे वाचलं का?

    follow whatsapp