Mahayuti Manifesto : लाडकी बहीणचे पैसे वाढवणार, विद्यार्थ्यांना मोठं आश्वासन, महायुतीच्या जाहीरनाम्यातल्या 10 गोष्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार

point

विद्यार्थ्यांनाही मोठं आश्वासन

point

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन

Kolhapur Mahayuti Sabha : कोल्हापुरात काल महायुती आणि महाविकास आघाडीनेही प्रचाराचं रणशिंग फुंकलं. यावेळी महायुतीकडून आपल्या जाहीरनाम्यातील 10 गोष्टी जाहीर करण्यात आल्या. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा काल पार पडली. यावेळी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलं. महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा उमेदवारांच्या प्रचारासाठी नारळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.


महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम काय? 
 

हे ही वाचा >>Satej Patil: काल ढसाढसा रडले, पण ठाकरेंनी आज सतेज पाटलांना खुदकन हसवलं!

  1. कोल्हापुरातील प्रचार सभेत महायुतीने दिलेली 10 आश्वासनं

  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणारे 12 हजार रुपये वाढवून 15 हजार करणार, तसंच एमएसपीवर 20 टक्के अनुदान देणार

  • हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

  • प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन
  • वृद्धांसाठीच्या निवृत्तीवेतानात वाढ करुन महिन्याला 2100 रुपये देणार 
  • राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार
  • 25 लाख रोजगार निर्मिती आणि  10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रशिक्षण शुल्क देणार
  • राज्यात 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते बांधले जातील.
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये प्रति महिना आणि सुरक्षा कवच देणार
  • वीज बिलात 30% कपात करून सौर उर्जेवर लक्ष केंद्रित करणार
  • सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 पूर्ण करणार
  • हे ही वाचा >>Mumbai Vidhan Sabha Seats: मुंबईतील तुमच्या मतदारसंघातील उमेदवार कोण?, पाहा संपूर्ण यादी

    राज्यात अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, ज्यामध्ये लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत महत्वाची जबाबदारी सरकारने घेतली असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधक लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले, त्यांना कोर्टाने झापलं. विरोधक म्हणाले 1500 रुपये लाच देतायत का? विरोधकांना माझ्याबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे होती, पण कुणाचाही मायेचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

      follow whatsapp

      ADVERTISEMENT