Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, लाडक्या बहिणांनी देणार 'एवढे' पैसे वाढवून!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

लाडक्या बहिणांनी देणार 'एवढे' पैसे वाढवून!
लाडक्या बहिणांनी देणार 'एवढे' पैसे वाढवून!
social share
google news

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या चांगलाच जोर पकडला असून महायुतीच्या वतीने आज (5 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये संयुक्त जाहीर सभा घेण्यात आली. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण याचसोबत माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि दोनच महिन्यात त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. ज्यानुसार गरजू महिलांना दरमहा सरकार 1500 रुपये देत आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : महिलांनो, तुमच्या 'या' खात्यात 4500 होणार जमा?

मात्र,  आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील जाहीर सभेत  लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत महिलांना 1500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करून ते दरमहा 2100 रुपये एवढे देण्यात येतील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार सीडिंग महत्त्वाचं

दरम्यान, या योजनेचा लाभा घ्यायचा असल्यास काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. कारण त्यानंतरच महिलांना त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत. यापैकीच महत्त्वाची बाब म्हणजे आधार सीडिंग. आता ते नेमकं काय आणि कसं करायचं हे सविस्तर जाणून घ्या.

हे ही वाचा>>  Ladki Bahin Yojana: बहिणींचे पुन्हा होणार लाड! खात्यात 4500 जमा? पण एकदा तुमच्या नावाची यादी तर पाहा

सर्वात आधी तुम्हाला npci.org.in या वेबसाईटवर क्लि करावं लागेल. त्यानंतर होम पेजवर Consumer वर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला आधार सीडिंगचा विकल्प दिसेल. ते आधार सीडिंग एनेबल करा. त्यानंतर लगेच आधार क्रमांक भरा. या प्रोसेस झाल्यावर बँक खाते आणि खाते क्रमांक अचूकपणे निवडा. त्याबाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि कॅप्चा भरा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि आधार बँकेतू सीडिंग केले जाईल.

ADVERTISEMENT

डीबीटी स्टेटस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांनी सर्वात आधी डीबीटी (DBT) स्टेटस तपासावं. डीबीटी स्टेटस तपासण्यासाठी होम पेजवर असलेल्या आधार सीडिंग पेजवर भेट द्यायची. या पेजवर Request To Aadhar Seeding बटणावर क्लिक करा. त्यानंतर Get Aadhaar Mapped Status वर क्लिक करा. आधार नंबर टाकून कॅप्चा भरा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर डीबीटी स्टेटस दिसेल. डीबीटी एनेबल आहे की नाही याची खात्री करा. डीबीटी एनेबल असल्यास पैसे जमा होतील. पैसे खात्यात जमा झाले नाही, तर बँकेत जाऊन डीबीटी सुरु करा.

ADVERTISEMENT

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT