Mahayuti : महायुतीत 4 जागांवरुन अंतर्गत कलह? 'या' उमेदवारांवर शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप असल्याची चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसैनिक भाजपच्या उमेदवारांवर नाराज?
शिवसैनिक भाजपच्या उमेदवारांवर नाराज?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या 4 जागांवर शिवसेनेचा आक्षेप

point

मुख्यमंत्री शिंदेचे शिवसैनिका नाराज?

point

महायुतीत अंतर्गत कलह?

Mahayuti Seat Sharing मुंबई : राज्यात यंदा विधानसभेच्या रिंगणात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्तीसह अनेक लहान पक्ष उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महायुती आणि मविआच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे सर्वांसमोरच जागा वाटपाचं मोठं आव्हान होतं. या सगळ्या गोंधळात नाराजांची संख्या देखील वाढली आहे. आतापर्यंत भाजपने 99, एकनाथ शिंदे यांनी 45 आणि अजित पवार यांनी 38 उमेदवारांची नावांची यादी जाहीर केली आहे. तर अद्यापही काही जागांवर चर्चा सुरू आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या काही जागांवर भाजपने आक्षेप घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ( CM Eknath Shinde Shiv Sena Objection on Kalyan East, Thane, Airoli, Murbad)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 45 जागांची यादी जाहीर केली. नाराज असल्याची चर्चा असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये संधी दिली. तर भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र त्यानंतर आता भाजप ज्या जागांवर उमेदवार देणार आहे अशा काही जागांवरही शिवसेनेने आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण पूर्व, ठाणे, ऐरोली आणि मुरबाड या जागांचा यामध्ये समावेश असल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा >>Amol Mitkari Akola : राष्ट्रवादीचं काही अस्तित्व आहे की नाही... उमेदवारीसाठी आक्रमक, मिटकरी इरेला पेटले

 

भाजपने कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. याला शिवसेनेने विरोध केला आहे. कारण वर्षभरापूर्वी घडलेल्या एका घटनेत गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या महेश गायकवाड या नेत्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे शिवसैनिक सुलभा गायकवाड यांना विरोध करतायत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. यावरही शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यानंतर मुरबाडमधून उमेदवारी दिलेल्या शंकर कथोरे आणि ऐरोलीतील गणेश नाईक यांनाही शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध असल्याची अंतर्गत गोटात चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीतही काही जागांवरुन एकमत नसल्याचं दिसतंय. तरी भाजप आता यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT