Nana Patole: "...तर आम्ही शपथविधीला नक्कीच गेलो असतो", नाना पटोले 'हे' काय बोलून गेले

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Nana Patole On Devendra Fadnavis
Nana Patole On Devendra Fadnavis
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच नाना पटोलेंचं मोठं विधान

point

"आमचे मित्र मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना..."

point

नाना पटोले फडणवीसांबाबत नेमकं काय म्हणाले?

Nana Patole On CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणीच उपस्थित नव्हतं, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. यावर नाना पटोले म्हणाले, मला एक कळत नाही..निरोप कुणाला दिला याची माहितीच आम्हाला नाही. निरोप दिला असता तर नक्कीच गेलो असतो आम्ही. कारण महाराष्ट्राची परंपरा आहे. काल मी देवेंद्रजींचं ऐकत होतो. ते म्हणाले, मी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना बोलावलं होतं. आम्हाला तर कधी बोलावलं नाही. त्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही, असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

ADVERTISEMENT

नाना पटोले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "आमचे मित्र मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा. पाच वर्षात महाराष्ट्र पुढे जावा. महाराष्ट्रातला शेतकरी सुखावा, तरुणांना न्याय मिळावा. महाराष्ट्रात महागाई कमी व्हावी आणि महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. आमचे मित्र फडणवीस महाराष्ट्रसाठी काम करतील, असा मला विश्वास आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी एक घोषणा केली होती. महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीची भरती आम्ही बंद करू, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली होती. पण आता राज्यात शिक्षक कंत्राटी भरती आणि इतर भरतीचं पेव फुटलं आहे, ते त्यांनी थांबवाव".

हे ही वाचा >> ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच पाकिस्तानमध्ये खळबळ! ISI ने 'मुंबई 26/11' च्या मास्टरमाईंडला केलं अंडरग्राऊंड

"फडणवीसांची एक भूमिका नेहमी राहिली आहे, ते जे बोलतात त्याप्रमाणे ते करतात. म्हणून कंत्राटी भरतीबद्दल त्यांचा जो निर्णय आहे. ती भरती महाराष्ट्रात न करता, त्यांनी रेग्युलर भरती महाराष्ट्रात करावी. कारण महाराष्ट्रात दोन लाखांच्या वर जागा रिक्त आहेत. जनतेची गैरसोय होत आहे. महाराष्ट्रातील शासकीय आमि निमशासकीय ज्या रिक्त जागा आहेत, त्या सर्व भराव्यात. ग्रामीण भागात आणखी भयानक परिस्थिती मी पाहिली आहे. राज्यात बसेस नाहीत. ग्रामीण भागातले एसटी बसेसचे मार्ग बंद झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये? CM होताच फडणवीसांनी थेट सांगितलं

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली ही योजनाच महाराष्ट्र बंद करतेय का? ही भीती या निमित्ताने निर्माण झालीय. म्हणून तातडीनं सर्व डेपोला बसेस पुरवाव्यात. ग्रामीण भागातील एसटी बसेसच्या व्यवस्था महाराष्ट्रात पूर्ववत सुरु कराव्यात आणि शेतकऱ्यांचं तातडीनं कर्ज माफ करावं. सोयाबिन, कापूस उत्पादकाला जे आश्वासन दिलं आहे, त्याचं तातडीनं पालन करावं. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, या आमच्या अपेक्षा आहेत", असंही नाना पटोले म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT