Devendra Fadnavis meets Eknath Shinde : फडणवीसांचा ताफा वर्षा बंगल्यावर, शिंदेंच्या भेटीला जाण्याचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला

point

वर्षा बंगल्यावर काय चर्चा होणार?

दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज वर्षा निवासस्थानी जात शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शपथविधीबद्दल आणि खातेवाटपाबद्दल चर्चा होईल अशी शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. दिल्लीमधून अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे परत आल्यानंतर तब्बल 6 दिवसानंतर ही पहिली भेट होत आहे. राज्यात महायुतीच्या सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र अजूनही नाराजीच्या चर्चा कायम असल्यानं ही भेट महत्वाची असणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sachin Tendulkar meets Vinod Kambli : स्टेजवर विनोद कांबळीला पाहताच भेटायला गेला 'सचिन'; राज ठाकरेंनी...

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याचं दिसतंय. आज शिंदे त्यामुळेच ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठीही गेले होते. त्यानंतर आता फडणवीस त्यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे ते प्रकृतीबद्दलच चर्चा करणार की मंत्रिपदाच्या वाटपाबद्दलही चर्चा करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अजूनही सत्तास्थापनेबद्दलच्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट नसल्यानं देशाच्या राजकारणात सध्या या विषयाची चर्चा सुरू आहे. मागच्या दिवसांमध्ये दिल्लीत आणि राज्यात बैठका घडल्या. मात्र, या बैठकांमधून फक्त मुख्यमंत्री भाजपचा होणार एवढंंच स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर अजूनही महायुतीने दिलेलं नाही. त्यापूर्वीच भाजपने शपथविधीची तारीखही घोषित केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "शिंदेंच्या बरोबरीतच आम्हालाही...", मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्यापूर्वी भुजबळांची मागणी

एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले असले, तरी दुसरीकडे गृहमंत्रिपदासाठी त्यांचा आग्रह असल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी होती, त्यामुळे आता शिंदेंना मुख्यमंत्रिपद द्यावं असा सूर शिवसेनेचा दिसतोय. त्यामुळे आज फडणवीस आणि शिंदे यांच्या चर्चेमध्ये कोणते मुद्दे येणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे. 


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT