Raj Thackeray: 'माझा हातात सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा...', राज ठाकरेंनी ऐन निवडणुकीत पुन्हा...
Raj Thackeray on Bhonga: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. पाहा अमरावतीमधील सभेत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा हाती घेतला भोंग्यांचा मुद्दा
महाराष्ट्राची सत्ता हाती दिली तर मशिदीवर भोंगे दिसणार नाही, राज ठाकरेंचा दावा
अमरावतीच्या सभेत राज ठाकरे पाहा नेमकं काय म्हणाले
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: मुंबई: 'राज ठाकरेचा शब्द आहे माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, एकाही मशिदीवर एकही भोंगा दिसणार नाही.' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. अमरावतीमधील जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंनी भोंग्यांवर बोलत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. (maharashtra assembly election 2024 give power to me not a single bhonga will be seen on a mosque in maharashtra raj thackeray took up the issue of bhonga again in the election)
ADVERTISEMENT
अमरावतीच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मी आता अमरावतीत आल्यावर माझा मोबाइल ऑन केला त्यावर मला एकाने एक क्लीप पाठवली. एक मुसलमान मौलवी याने एक फतवा काढला आहे. हे सगळे मुसलमान आता मशिदीमधून फतवे काढायला लागले आहेत. की, काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्व मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान करायचं. असे फतवे निघतायेत. आता लोकसभेला पण जाणवलं. एकगठ्ठा मतदान करतात ते.. आम्हीच विखुरलेले... या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारा मनसे हा एकमेव पक्ष होता आणि राहील.'
हे ही वाचा>> Sadabhau Khot: 'पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का?', फडणवीसांसमोरच सदाभाऊ खोत बरळले!
'या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरून मी सांगितलं होतं. या सगळ्या मशिदींवरचे यांचे भोंगे पहिले उतरवून टाका. बंद झाले होते.. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस... सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते. मी सांगितलं होतं की, सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद नाही झाले तर माझा मनसैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा बोलेल मशिदीसमोर.. हे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या 17 हजार मनसैनिकांवर केसेस टाकल्या.'
'म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा.. त्यांना जपतायेत आणि माझ्या मुलांवर केसेस टाकतायेत. मुंबईच्या समुद्रकिनारी एक दर्गा बांधली होती तिथे छोटी... मी जेव्हा ती जाहीररित्या दाखवली सगळ्यांसमोर तर ती रात्रीच्या रात्री पाडली गेली.'
हे ही वाचा>> CM Eknath Shinde : "युती धर्माचं पालन होत नाहीये..."; एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत भाजप नेत्यांची तक्रार?
'हिंमत कशी होते यांची? हिंमत एवढ्यासाठीच होते की, ही आमची बुळबुळीत सरकारं आहेत ना जी कोणत्या भूमिका घेत नाही. कशाला आपल्याला त्यांची मतं हवीत...'
ADVERTISEMENT
'मी तुम्हाला आताच सांगतो.. राज ठाकरेचा शब्द आहे उद्या तुम्ही माझ्या हातात या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर दिली तर एकाही मशिदीवर एकही भोंगा या महाराष्ट्रात दिसणार नाही.'
ADVERTISEMENT
'हे रस्त्यावर येऊन नमाज पडतात. तुमचा धर्म तुमच्यापाशी. कोणताही धर्म तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर आला नाही पाहिजे.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT