Vidhan Sabha Survey Report : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा महायुती सरकारवर नाराज? महाराष्ट्राचा मूड काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील सराकरवर जनता नाराज की खूश?

point

महायुतीचं सरकार पुन्हा यावं असं किती लोकांना वाटतं?

point

मतदारांच्या सर्व्हेमधून आलेली आकडेवारीचा अर्थ काय?

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मागचा महिनाभराचा काळ चर्चेत राहिला तो जागा वाटपाच्या मुद्दयावरुन. त्यानंतर काल 29 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, त्यामुळे बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालंय. तरी काही जागांवरुन अजूनही रस्सीखेच सुरू आहे. 20 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या मतदानात जनता कुणाला पसंती देऊ शकते? सरकारबद्दल जनतेला काय वाटतं? कोणत्या मुद्दयांवरुन मतदार नाराज आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सी-व्होटरच्या सर्व्हेतून करण्यात आला. ( Mahrashtra Vidhan Sabha Elections 2024 Survey by C Voter)


राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडून गेल्या. या राजकीय स्थित्यंतरानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे पक्ष सहभागी आहेत. या सरकारबद्दल जनतेला काय वाटतं? जनता या सरकारच्या कामांबद्दल संतुष्ट आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व्हेतून करण्यात आला. यावर लोकांनी काय मतं व्यक्त केलीत. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्याच्या सरकारच्या कामांवर जनता संतुष्ट आहे का?

हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 LIVE : "शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट" रमेश चेन्नीथला स्पष्टच बोलले!


सरकारने केलेल्या कामाबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे का? तसंच राज्यातलं सरकार बदलायला पाहिजे का हा प्रश्न विचारल्यानंतर राज्यातील जनतेने दिलेले उत्तरं टक्केवारी स्वरुपात जाणून घेऊ. 

  1. राज्यातील 4.0 टक्के लोकांनी याबद्दल मत व्यक्त केलं नाही

ADVERTISEMENT

  • 51 टक्के लोकांना सरकार बदलावं असं वाटतंय.

  • ADVERTISEMENT

  • राज्यातील 3.7 टक्के लोक नाराज आहेत, मात्र सरकार बदलावं असं त्यांना वाटत नाही.

  • राज्यातील 41 टक्के लोक सरकारवर नाराज नाहीत, त्यामुळे त्यांना हे सरकार बदलावं असं वाटत नाही. 
  • राज्यात कोणत्या भागात सरकारबद्दल सर्वात जास्त नाराजी?

     

    हे ही वाचा >>Maharashtra Politics : ना मविआ, ना महायुती... राज्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही? काय आहे तज्ञांचा अंदाज?

     

    मुंबई  51.2% 
    कोकण 42.5% 
    मराठवाडा 52.9% 
    उत्तर महाराष्ट्र 49.8% 
    विदर्भ 51.9% 
    पश्चिम महाराष्ट्र 55.6%
    संपूर्ण महाराष्ट्र 51%




     

      follow whatsapp

      ADVERTISEMENT