NCP : शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, 'घड्याळ' चिन्हाच्या सुनावणीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp clock symbol hearing in suprime court sharad pawar ncp vs ajit pawar ncp maharashtra assembly election 2024
शरद पवारांना झटका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना दिलासा

point

'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा

point

सुनावणीत काय काय घडलं?

Supreme Court on Symbol, Ajit Pawar Ncp VS Sharad Pawar Ncp : आगामी विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला  सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा दिली आहे. तसेच मात्र त्यांना या निवडणुक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागणार आहे, असे निर्देशही दिले आहेत. (ncp clock symbol hearing in suprime court sharad pawar ncp vs ajit pawar ncp maharashtra assembly election 2024) 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने 2 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते. तसेच मात्र त्यांना या निवडणुक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागणार आहे. 

हे ही वाचा : Mahayuti : महायुतीत 4 जागांवरुन अंतर्गत कलह? 'या' उमेदवारांवर शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप असल्याची चर्चा

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या पक्षाला यासंदर्भात नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे. आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापर करू, असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत या आदेशालचे पालन झालेच पाहिजे,असे न्यायालयाने बजावले आहे. आणि आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न होत आहे असे आम्हाला वाटत असल्यास, आम्ही आपोआप अवमानाचा खटला सुरू करू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आजच्या सुनावणी दरम्यान, शरद पवारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित गटावर त्यांच्या निवडणुकीच्या पोस्टरमध्ये अस्वीकरण समाविष्ट न केल्याचा आरोप केला होता. सिंघवी म्हणाले की, प्रतिस्पर्धी गटाला फक्त मते मिळविण्यासाठी शरद पवारांशी संगनमत करायचे आहे. सुनावणीदरम्यान सिंघवी म्हणाले की, आदेश देऊन तुम्ही (सुप्रीम कोर्टाने) त्यांना (अजित गटाला) स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते की, तुमचा शरद पवारांशी संबंध नाही आणि तुम्ही पूर्णपणे अजित पवार गटाचे आहात. मात्र अजित गटाकडून असा कोणताही डिस्क्लेमर जारी करण्यात आलेला नाही.

हे ही वाचा : Anil Deshmukh Book : '...नाहीतर घरातल्या महिलांनाही चौकशीला बोलवू', देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT