Sadabhau Khot: 'पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का?', फडणवीसांसमोरच सदाभाऊ खोत बरळले!
Sadabhau khot controversial statement:सांगलीच्या जतमध्ये महायुतीची सभा होती. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका
शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली
सदाभाऊ खोत यांनी पवारांवर एकेरी शब्दात केली टीका
Sangli Jat Mahayuti Sabha : सांगलीच्या जतमध्ये आज गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली. "पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या... पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?" असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांचं भाषण सुरू असताना मंचावर देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार, मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं... पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या... पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवरही टीका
हे ही वाचा >>CM Eknath Shinde : "युती धर्माचं पालन होत नाहीये..."; एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत भाजप नेत्यांची तक्रार?
उद्धव ठाकरे म्हणले एक जॅकेटवालं, एक दाढीवालं, पण उद्धव ठाकरे तुम्हीच दाढ्या कुरवाळत बसलेत असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी टीका केली. अडीच वर्षात तुम्ही घराबाहेर निघाले नाही, शेतकऱ्याचा भाजीपाला सडला, दूध रस्त्यावर सांडलं, तुम्ही एकही रुपया शेतकऱ्याला मदत केली नाही, त्यामुळे तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
एकूणच सदाभाऊ खोत हे आपल्या खास शैलीतील भाषणासाठी चर्चेत असतात. शरद पवार यांच्यावरही ते नेहमी टीका करत असतात. मात्र यावेळी ते थेट त्यांच्या शारीरिक व्यंगावर बोलले असल्यानं नव्या वादाची शक्यता आहे. राज्यात कालच विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलं. कोल्हापुरातून काल महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरू झाल्या. आजही सगळे नेते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात प्रचारासाठी मैदानात आहेत. यादरम्यानच सदाभाऊ खोत यांचं हे स्टेटमेंट समोर आल्यानं आता इतर नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT