Mumbai Tak Chavdi: 'अमित ठाकरे मुख्यमंत्री...?', मनसेचे 6 नगरसेवक फोडण्यावर वरुण सरदेसाई स्पष्टच बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Varun Sardesai On Amit Thackeray
Varun Sardesai Mumbai Tak Interview
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरुण सरदेसाईंनी अमित ठाकरेंवर केली सडकून टीका

point

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते का?

point

वरुण सरदेसाईंनी मुंबई तकच्या चावडीत स्पष्टच सांगितलं

Varun Sardesai On Amit Thackeray :  एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार पळून गेले, त्यानंतर गद्दार आणि पन्नास खोके असा आरोप केला गेला. जेव्हा मनसेचे सहा नगरसेवक फोडले, त्या गोष्टीला कशा पद्धतीने बघायचं? उद्धव ठाकरे आजारी असताना 40 आमदार गेले, पण अमित ठाकरेही तसंच म्हणाले, मी आजारी असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आमचे सहा नगरसेवक फोडले गेले, याकडे कसं पाहायचं?  या प्रश्नाचं उत्तर देताना युवासेनेचे (ठाकरे गट) सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते अमित ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

"अमित ठाकरे मुख्यमंत्री होते का? अमित ठाकरे कोण होते 2017 ला ? अमित ठाकरेंचा काय संबंध आला? उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. काय नगरसेवक नगरसेवक करत आहेत, त्यानंतर त्यांनी काय केलं, आपण कुणाची तुलना करतोय, हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे. 40 आमदार आणि यांची तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत सरदेसाईंनी अमित ठाकरेंचा समाचार घेतला. ते मुंबई तकच्या चावडीत बोलत होते.

हे ही वाचा >>  Mumbai Tak Chavdi: उद्धव ठाकरेंचे 40 आमदार शिंदेंसोबत कसे पळाले? वरुण सरदेसाईंनी सांगितली A To Z स्टोरी

मुंबई तकच्या चावडीत वरुण सरदेसाईंनी अमित ठाकरेंवर केली टीका

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले, असं अमित ठाकेर म्हणाले होते, यावर वरुण सरदेसाईंनी सडेतोड प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, "अमित ठाकरे मुख्यमंत्री होते? अमित ठाकरे कोण होते 2017 ला ? अमित ठाकरेंचा काय संबंध आला? उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वत: एबी फॉर्म देऊन या लोकांना शुन्यातून उभं केलं आहे. आमचा या लोकांनी पक्ष फोडला. बाळासाहेबांचं धनुष्यबाण चिन्ह आणि आमचं नाव या लोकांनी चोरलं, म्हणून या लोकांना आम्ही गद्दार म्हणतो. पक्षात किती लोकं सोडून जातात. आमच्या पक्षातून किती लोक गेले आहेत. व्यक्तीगत कारणामुळे कुणी सोडून जातो, या सर्वांना आम्ही गद्दार थोडीच म्हणत असतो.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट

हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं, हे कुणाला पटण्यासारखं आहे. काय नगरसेवक नगरसेवक करत आहेत, त्यानंतर त्यांनी काय केलं, आपण कुणाची तुलना करतोय, हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे. 40 आमदार आणि यांची तुलना होऊ शकते का? मुंबई महानगरपालिकेत आमच्याकडे 85 नगरसेवक होते. त्यात आम्हाला आणखी सहा जॉईन झाले. ते शिंदे गटात गेले, आता अमित ठाकरे त्यांचा प्रचार करणार आहेत. किंवा लोकसभेत केला पण असेल. त्यांना राजकारण माहिती नाही. दिलीप लांडे तिकडे शिंदे गटातूव लढत आहेत आणि हे काय आम्हाला विचारत आहेत."

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT