पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी (कल्याण)

ADVERTISEMENT

PM Modi Dream project Mumbai-Baroda highway Scam: कल्याण: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट (Dream Project) असलेल्या मुंबई-बडोदा महामार्गातील (Mumbai-Baroda Highway) बाधित जमिनीच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. या महामार्गात कल्याण (Kalyan) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींसह नागरिकांची घरे बाधित झाली असून या महामार्गात एक अजब घोटाळा समोर आला आहे. (allegation of crores of rupees scam in prime minister modis dream project mumbai baroda highway)

धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या नावावर बाधित जमीन नसतानाही तब्बल 2 कोटींच्यावर बाधित जमिनीचा मोबदला दिला गेल्याच प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कल्याणच्या उपविभागीय कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करून या घोटाळ्याची सखोल चौकशीची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.

कल्याणनजीक बल्याणी या गावात तक्रारदार मोहमद शहीद मिठाईवाले हे राहत असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. यांच्या नावाने मुंबई-बडोदा महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीचा सर्वे नंबर व त्यामध्ये उभ्या असलेल्या चाळी दाखवून वर्षभरापूर्वी 2 कोटी 8 लाख 60 हजार 376 रुपये रक्कम साजिद रईस या व्यक्तीने जमिनीचा मोबदला घेतल्याचे समजताच, त्यांनी माहितीच्या अधिकारात याप्रकरणाची कागदपत्रे मागवली, त्यानंतर हा घोटाळ्याचा प्रकार समोर आला. आता या प्रकरणी त्यांनी पुराव्यांसह कल्याणमधील उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी असाच प्रकार घडला असून भिवंडी तालुक्यातील नंदिठणे गावातील मुंबई-बडोदा महामार्गात आठ शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केली होती.

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तार गोत्यात; कोर्टाचे ताशेरे, अधिवेशनात गाजणार ‘जमीन घोटाळा’

ADVERTISEMENT

यामध्ये शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळालेली 11 कोटी 66 लाख 64 हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांबरोबर, शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या शिवाय मुंबई-बडोदा महामार्गात मृत महिलेच्या नावाने 85 लाख रुपये जमिनीचा मोबदला दलालांच्या साखळीने लाटला होता. मात्र श्रमजीवी संघटनेने आवाज उठवल्यानंतर दलालाच्या टोळीवर गुन्हा दाखल होताच 85 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले होते.

पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊतांचं नाव कसं आलं?

एकंदरीत भिवंडीनंतर पुन्हा कल्याण तालुक्यात मुंबई-बडोदा महामार्गातील आणखी एक घोटाळा समोर आल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. याबाबत कल्याण उप विभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांच्याशी संर्पक साधला असता, सदरच्या प्रकरणात आमच्या कार्यालयात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्यावर सुनावणी होऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT