बारसूच्या राड्यावर मुख्यमंत्री म्हणाले.. हे तर सर्वसामान्यांचं सरकार… अन्याय करणार नाही!

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Reaction on Barsu Refinery
CM Eknath Shinde Reaction on Barsu Refinery
social share
google news

CM Eknath Shinde Reaction on Barsu Refinery :राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery Project) माती सर्वेक्षण सुरू आहे. या माती सर्वेक्षणा दरम्यान आज पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली होती. यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडण्यात आला होता.या सर्व प्रकारावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नसल्याची माहिती दिली आहे. तसेच हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे.कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली जाणार नाही, असे देखील आंदोलकांना आश्वस्त करण्यात आले. (barsu refinery Clashes between police and protesters cm eknath shinde reaction)

ADVERTISEMENT

मी स्वत: उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली आहे.सध्या बारसू परिसरात शांतता आहे.कोणताही लाठीचार्ज तिकडे झाला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी मला दिली आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. हे गावकरी आहेत, शेवटी यांच्या संमतीने आपल्याला कुठलाही प्रकल्प त्यांच्यावर अन्याय करून पूढे न्यायचा नाही, ही भूमिका सरकारची असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : ‘दिल्लीतील सैतान आदेश देतायेत, उद्या हॅन्डग्रेनेडही फेकतील..’,बारसूवरून राऊत आक्रमक

हा प्रकल्प त्या भागातील नागरीकांना रोजगार देणारा आहे. या प्रकल्पाचा फायदा त्यांना कसा होईल हे सांगितले जाईल. त्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठल्याही परिस्थितीत अन्याय,जोर जबरदस्ती करून कुठलीही प्रक्रिया होणार नाही,अशी सरकारची भूमिका आहे.तसेच आंदोलकांना शांततेच आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आंदोलक-पोलीस आमने सामने

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery Project) मातीचे सर्वेक्षण सुरु असताना आज दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलक सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले होते.यामध्ये महिला,पुरुष आणि तरूणांचा समावेश होता. पोलिस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे काही वेळापुर्वीची दृष्य होती. या आंदोलकांना घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील होता.या पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला होता. या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या आंदोलकांवरील वापरानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

हे ही वाचा : बारसूमध्ये तुफान राडा, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट; रिफायनरीचा प्रश्न चिघळला

विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे बारसू (Barsu Refinery Project) येथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून राऊत आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT