Kshama Bindu : स्वत:शीच लग्न केलेल्या ‘या’ तरुणीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस
गुजरातमधील वडोदरा येथील एका 24 वर्षीय तरुणीने वर्षभरापूर्वी पारंपारिक पद्धतीने स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने ती प्रचंड व्हायरल झाली. या तरूणीचं नाव क्षमा बिंदू असं आहे. क्षमाने 11 जून 2022 रोजी स्वतःशी लग्न केले. तेव्हापासून ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
ADVERTISEMENT
गुजरातमधील वडोदरा येथील एका 24 वर्षीय तरुणीने वर्षभरापूर्वी पारंपारिक पद्धतीने स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने ती प्रचंड व्हायरल झाली. या तरूणीचं नाव क्षमा बिंदू असं आहे. क्षमाने 11 जून 2022 रोजी स्वतःशी लग्न केले. तेव्हापासून ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जिथे-तिथे क्षमाचीच चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. गेल्यावर्षी हळदी, मेहंदी, संगीत यांसारखे कार्यक्रम हिंदू रिती-परंपरेनुसार थाटामाटात पार पडले. आता क्षमा बिंदूच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. (First wedding anniversary of Kshama Bindu who is married to herself)
ADVERTISEMENT
क्षमाने आयुष्याचा जोडीदार म्हणून एक वर्ष स्वतःसोबत राहण्याचा तिचा अनुभवही सर्वांसोबत सेअर केला आहे. तिचे खरे नाव सौम्या दुबे आहे. तिने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. क्षमा म्हणते की, तिला समाजाची जुनाट विचारसरणी तोडायची होती, म्हणून तिने स्वतःशी लग्न केलं. क्षमाला लग्नात काही अडचण नाही पण समाजात लग्नाकडे ज्या पद्धतीने बघितले जाते त्याची अडचण आहे. म्हणून तिला ही कल्पना सुचली आणि तिने स्वत:शीच लग्न केलं. ती म्हणते की, ‘मी कधीच कल्पना करू शकत नाही की मी कोणाची पत्नी होईन. मला असे जीवन नको आहे जिथे मी आनंदी नाही.
Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…
पुढे क्षमा म्हणाली, ‘तिने अनेक महिला पाहिल्या आहेत ज्या लग्नानंतर स्वतःला विसरतात आणि त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही.’ तिच्या आई-वडिलांनीही लग्न केले या प्रश्नावर क्षमा म्हणते, ‘मी लग्नाच्या विरोधात नाही. मला माझ्या आई-वडिलांना एकत्र बघायला आवडतं. पण समाजात लोक ज्या पद्धतीने विवाहाकडे पाहतात, तसे होऊ नये. स्वत:शीच लग्न केल्यामुळे माझ्यावर कोणताही दबाव नाही, किंवा लोक मला मूलासाठी त्रास देत नाहीत, मी माझे आयुष्य मला हवे तसे जगू शकते.’
हे वाचलं का?
जरी क्षमाने स्वतःला विवाहित म्हणवण्यास सुरुवात केली असली तरी अधिकृत कागदपत्रांवर तिची वैवाहिक स्थिती अविवाहित आहे. ती म्हणते की, ‘मला खूप वाईट वाटते की भारतात सोलोगॅमी मॅरेजसारखे काहीही नाही. त्यामुळे मला इच्छा नसतानाही सर्व सरकारी कागदांवर अविवाहितच लिहावे लागते.’
Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
‘मी एक वर्ष माझ्यासोबत घालवले’- क्षमाने शेअर केला अनुभव
स्वत:शी लग्न केल्यानंतर क्षमाच्या आयुष्यात विशेष बदल झालेला नाही. ती म्हणते की, ‘कधी कधी मी छंदासाठी सिंदूर, मंगळसूत्र नक्कीच घालते. या गोष्टी कधीकधी माझं रक्षण करतात. पण आजही असे काही लोक आहेत जे नेहमी मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारत असतात.’
ADVERTISEMENT
क्षमा कोणत्या व्यक्तीशी लग्न करणार नाही का?
‘मी माझ्या भविष्याचा कधीच विचार केला नाही. पुढच्या 2 दिवसात मी काय करणार आहे हे देखील मला माहित नाही. जर कधी माझ्या आयुष्यात असा कोणी आला की जो मला खूप आवडतो तर मला त्याच्यासोबत राहायला नक्कीच आवडेल पण लग्न करण्याच्या बाजूने नाही. मुलाबद्दल सांगायचे तर, मलाही माझे स्वतःचे कुटुंब बनवायचे आहे, परंतु जेव्हा मी ही जबाबदारी घेण्यास ज्यावेळी सक्षम असेन तेव्हा मी मुलाचा विचार करेन आणि मुल दत्तक घेईन.’
ADVERTISEMENT
Amol Mitkari : “पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार, हे बावनकुळेंना माहितीये”
लग्नाचा पहिला वाढदिवस क्षमाने असा केला साजरा…
क्षमा बिंदूने तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या व्हिडीओमध्ये क्षमाने एका वर्षात काय केले याचे सर्व फोटो-व्हिडीओ आहेत. तसंच ‘एकला चालो रे..’ चा टॅटूही दाखवला आहे. यावर अनेक यूजर्सनी कमेंट्स करत क्षमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT