जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने रेल्वेसमोर घेतली उडी; कारण आलं समोर
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बॉर्डीगार्ड वैभव कदमने निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ‘मी आरोपी नाही’,असे सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहत त्यांनी आत्महत्या केलीय.
ADVERTISEMENT
jitendra awhad bodyguard vaibhav kadam commits suicide : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या बॉर्डीगार्डने आज आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वे लाईनवर त्यांनी आत्महत्या केली. वैभव कदम (vaibhav kadam)असे या बॉडीगार्डचे नाव होते. कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आत्महत्या केली आहे. ‘मी आरोपी नाही’,असे सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या शवविच्छेदन अहवालातून काय माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे. (jitendra awhad bodyguard vaibhav kadam commits suicides share whatsapp status)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम (vaibhav kadam) यांनी आज सकाळी निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी साधारण 9 च्या आसपास ही घटना घडली होती. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत दिवा शहर येथील गोकुळ हॉस्पिटल गाठलं होते. दरम्यान वैभव कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आला आहे.
हे ही वाचा : टेल्को कंपनीचे कामगार ते पुण्यातील भाजपचा चेहरा,असा आहे गिरीश बापटांचा राजकीय प्रवास
आत्महत्येपुर्वी सोशल मीडियावर पोस्ट….
विशेष म्हणजे वैभव कदम (vaibhav kadam) यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सोशल मीडियावर मोठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्ये मागचे कारण सांगितले आहे. साक्षी मला माफ कर, स्वर मला माफ कर, आई-पप्पा मला माफ करा, मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही, अशी खंत त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली. त्यानंतर मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.पण त्यात कुणाचाही दोष नाही,असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले. तसेच स्वर मला माफ कर, पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती मी आरोपी नाही, असे म्हणत त्यांनी आयुष्याचा शेवट केला.
हे ही वाचा : 1 कोटींच्या लाचेची मागणी; MIDC चा टेक्नीशियन लाचलुचपतच्या जाळ्यात, आमदाराचही नाव
दरम्यान जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांचे आत्महत्या केलेले तत्कालिक बॉडीगार्ड हे spo या पोलीस खात्यात कार्यरत होते. तसेच आत्महत्येपुर्वी त्यांनी मी आरोपी नाही असे म्हणत मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.आता या प्रकणात पोलीस तपास करत आहे. या तपासात आत्महत्येमागचं कोणते कारण समोर येते, हे पाहावे लागणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT