आता हॅलो नाहीतर वंदे मातरम् म्हणायचं…, खातं हातात येताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झाले. यामध्ये सांस्कृतिक खात्याची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरमुनगंटीवार यांच्या खांद्यावर पडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीयस्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम्म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत.

ADVERTISEMENT

१८०० मध्ये टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतआलो आहोत. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरकेला. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी वंदेमातरम्

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. 1875 मध्‍येबंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुलाप्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍याया रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते.

हे वाचलं का?

भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदेमातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. 1800 साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरुकरतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री म्हणून जाहीर केला असल्याचंसुधीर मुगंटीवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT