Nanded Court: भर कोर्टात न्यायाधीशांवर फेकली चप्पल, नंतर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कुवरचंद मंडले, नांदेड

ADVERTISEMENT

Accused threw slippers at judge in Nanded Court: नांदेड: नांदेडमधील (Nanded) सत्र न्यायालयामध्ये (Court) काल (11 जानेवारी) दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीने (Accused) चक्क न्यायाधीशांवरच (Judge) चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीच्या याच कृत्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी त्याला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा सुनावत लागलीच अद्दलही घडवली आहे. (accused threw slippers at judge in nanded court judge sentenced accused to 6 months)

कोर्टात नेमकं काय झालं?

दरोडा प्रकरणात अटक केलेला आरोपी दत्ता हंबर्डे याला पोलिसांनी सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं. पण या सुनावणीसाठी आरोपीचा वकीलच आला नसल्याने आरोपी दत्ता हंबर्डेने थेट न्यायाधीशांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी न्यायाधीश आणि आरोपीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ज्यानंतर अचानक आरोपीने आपल्या चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.

हे वाचलं का?

आरोपी दत्ताच्या या कृत्यामुळे न्यायाधीशांसह अवघं कोर्टरुम अवाक् झालं. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. पण त्यानंतर न्यायाधीशांनी या कृत्यासाठी आरोपीला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजारांचा दंड ठोठावला.

मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? काय म्हणाल्या आशा गवळी?

ADVERTISEMENT

या घटनेने नांदेड न्यायालयात एकच घटनेने खळबळ उडाली. जिल्हा न्यायालयात दरोडा व जबरी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला साक्षीसाठी बोलावण्यात आलेले असताना त्याने चक्क जिल्हा न्यायाधीश (प्रथम) यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यावेळी न्यायालयात एकच गोंधळ उडाला. या धक्कादायक प्रकारानंतर न्यायाधीश बांगर यांनी आरोपी दत्ता हंबर्डे याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

धक्कादायक ! सिगरेट न दिल्याचं निमीत्त, आरोपीने दुकानदाराची गळा चिरुन केली हत्या

आरोपी दत्ता हंबर्डेवर नेमके आरोप काय?

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपुरी येथील आरोपी दत्ता हरी हंबर्डे याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

तो मागील काही दिवसांपासून नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला व त्याच्या इतर साथीदाराला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) शशिकांत बांगर यांच्या न्यायालयासमोर साक्षीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी साक्ष सुरू असतानाच आरोपी दत्ता हंबर्डे याने आपल्या शर्टमध्ये आणलेली चप्पल न्यायाधीश बांगर यांच्या दिशेने भिरकावली. सुदैवाने आरोपीने फेकलेली चप्पल ही न्यायधीश बसलेल्या डायसच्या अलीकडेच पडली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा व न्यायालयीन कर्मचारी हे देखील काही क्षण स्तब्ध झाले होते. मात्र, नंतर पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेऊन त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT