ATS Action on Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरूवात, राज्यभरातून 16 जणांना अटक

मुंबई तक

बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्डसारखी भारतीय कागदपत्रे मिळवली होती असं ATS कडून सांगण्यात आलं आहे. एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ATS ची राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कारवाई

point

बांगलादेशी घुसखोरांविरोधात सरकार आक्रमक

राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 6 महिलांसह 16 बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक केली आहे. या लोकांकडे कोणतेही वैध कागदपत्र नसताना ते इथे वास्तव्यास असल्याचा आरोप आहे. एटीएसने सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 'गेल्या 24 तासात नवी मुंबई, ठाणे आणि सोलापूरमध्ये पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या 7 पुरुष आणि 6 महिलांना आम्ही अटक केली आहे. त्यांच्यावर फॉरेनर्स ॲक्ट आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्डसारखी भारतीय कागदपत्रे मिळवली होती असं ATS कडून सांगण्यात आलं आहे. एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपी भोकरदन तालुक्यात क्रशर मशीनवर काम करत होते. एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांना अन्वा आणि कुंभारी गावातून अटक करण्यात आली.

हे ही वाचा >> Parbhani Crime News : तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आला, नराधम पतीने पत्नीला जीवंत जाळून...

भारतात बेकायदेशीरपणे काम करण्यासाठी तिघांनीही आपली खोटी ओळखपत्रं  तयार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीरपणे ते इथे राहत होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि परदेशी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.

हे ही वाचा >> Beed: थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मोर्च्यात नेत्यांचा प्रचंड संताप

राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर पोलीस कारवाई सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं.देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, 'सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. बेकायदेशीरपणे भारतात राहत असलेले सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांना हद्दपार करण्याची सरकारची भूमिका असून, आम्ही हे काम सुरू केलं आहे. त्याच धर्तीवर मुंबई, नवी मुंबई, धुळे, भिवंडी आणि राज्यातील इतर भागात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची ओळख पटवण्यासाठी राज्य पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp