Nylon Manja Deaths : मांजा गळ्यात अडकला, थेट श्वासनलिका कापली गेली; राज्यात तिघांचा मृत्यू, 2 गंभीर

मुंबई तक

राज्यात काल मकर संक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता, पण यामध्येच अनेक धक्कादायक घटना घडल्या. राज्यभरात काल तिघांचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मकर संक्रांतीच्या दिवशीच राज्यात तिघांचा मृत्यू

point

नायलॉन मांजाने गळ्या कापल्यानं दोन जण गंभीर जखमी

point

अकोला, संभाजीनगर, नाशिकमध्ये धक्कादायक घटना

ऐन संक्रांतीच्या दिवशी अकोल्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणाचा नायलॉनच्या दोरीने गळा कापला गेला. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना नेहरू पार्कजवळील एनसीसी कार्यालयाजवळ घडली. सगळीकडेच मकर संक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता, पण यामध्येच  अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. राज्यभरात काल तिघांचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad Wife: वाल्मिक कराडची पत्नी म्हणते, 'महिनाभर आम्ही मरणयातना भोगतोय...'

मिळालेल्या माहितीनुसार, किरण सोनवणे हा दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक नायलॉनचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. गाडीच्या वेगामुळे मांजाचा गळ्याला घासला गेला आणि जसजशी गाडी पुढे गेली, तशी मान कापत गेली. या घटनेत थेट या तरूणाची श्वासनलिकाही कापली गेली. तो मुलगा जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. रूग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अकोल्यात नायलॉन मांजाची ही पहिलीच घटना नसून, याआधीही अनेक दुःखद अपघात घडले आहेत. महानगरपालिका कर्मचारी मंगेश बोपटे यांचाही गळा नायलॉनच्या मांजाने कापण्यात आला होता. ज्यामुळे त्यांच्या मानेवर 14 ते 15  टाके पडले. 

हे ही वाचा >>  Walmik Karad: 'माझ्या छातीत दुखतंय...', मकोका लागताच वाल्मिक कराडच्या छातीत आली कळ

जुन्या शहरातील गुरुदेव नगरमध्ये, कलावती मराठे नावाच्या महिलेच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने ती महिलाही गंभीर जखमी झाली. या महिलेच्या पायाला 45 टाके पडले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे गावातील 22 वर्षीय विश्वजीत रोठे हा तरूणही नायलॉनच्या मांजाने जखमी झाला. 

दरम्यान, संभाजीनगरमध्येही पोलीस निरीक्षकाच्या दीपक पारधे यांच्याही गळ्याला गंभीर दुखापत झाली असून, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नाशिकमध्येही अशीच एक घटना घडली असून, 22 वर्षीय सोनू धोत्रे या तरूणाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp