देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणालेत जे. पी. नड्डा?
“महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीनंतर त्या राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावं. भाजपचं स्थान या सरकारमध्ये राहावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं म्हटलं आहे.”
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीस यांनी आमची विनंती मान्य केली आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील हे जे. पी. नड्डा यांनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या जनतेबाबत वाटणारं त्यांचं प्रेमच य़ा निर्णयातून दिसून येतं आहे असंही जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. आज सकाळपासून ही चर्चा सुरू होती की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार. मात्र गोव्याहून महाराष्ट्रात जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा विविध घडामोडी घडल्या. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी सागर या बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी हेदेखील असंही सांगितलं होतं की मी या सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे.
ADVERTISEMENT
मात्र शपथविधीला थोडा वेळ उरलेला असताना जे. पी. नड्डा यांनी हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील. त्यानंतर अमित शाह यांनीही ट्विट केलं की आमची विनंंती देवेंद्र फडणवीस यांनी दिलदारपणा दाखवत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार हे नक्की झालं आहे. या आशयाचं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून मोठी खळबळ उडवून दिली होती. या सगळ्याचा शेवट कोणत्या दिशेने होईल याची चर्चा सुरू असतानाच त्यात भाजपची एंट्री झाली. त्यानंतर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काय होणार याची चर्चा होती. विविध चर्चा सुरू होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT