Santosh Deshmukh Case : मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन, दखल न घेतल्यास दोन दिवसानंतर...
Massajog Protest : आरोपींना अटक व्हावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी आज मासाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत. सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू होणार असून यामध्ये गावातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अडीच महिने उलटले

आरोपी कृष्णा आंधळे सापडेना, देशमुख कुटुंबाचा तपासावर संशय

देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून आंदोलन
Massajog Protest : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अडीच महिना उलटला. मात्र, अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधले हा फरार आहे. तर दुसरीकडे इतर आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुजोरी, आरोपी आणि पोलिसांचे संबंध, पोलिसांकडून केली जाणारी टाळाटाळ, या मुद्द्यांमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का अशी शंका उपस्थित केली जातेय. याच सर्व प्रश्नांना धरून मस्साजोगकर आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार ते आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात करत आहेत.
हे ही वाचा >>Raju Patil : गंगेत कधीही डुबकी मारली तर पाप धुतलं जाईल, पण इथं पुण्य जास्त मिळेल, एकनाथ शिंदेंवर मनसेचा थेट निशाणा
आरोपींना अटक व्हावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी आज मासाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत. सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू होणार असून यामध्ये गावातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. दोन दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणीही त्यागनार असल्याचं रात्री गावकऱ्यांच्या बैठकीत ठरलं.. त्यामुळे मसाजोग गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सरकारची डोकेदुखी ठरणार का पाहणं महत्त्वाचं असेल.
चौकशी नीट झाली पाहिजे, आमचा माणूस गेलाय, आम्ही पीडित आहेत, घटनेच्या दिवशी मनोज जरांगे आल्यामुळे कारवाई झाली, आमच्या मनात चीड आहे, आमचा माणूस येणार नाही, पम आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणूनच आम्ही संवेदनशील मार्गाने हे आंदोलन सुरू करतोय असं धनंजय देशमुख म्हणाले.
हे ही वाचा >> Sharad Pawar: "नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं...", पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
सुरूवातीचे दोन दिवस आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. मात्र, या दोन दिवसात जर कुणी दखल घेतली नाही, तर परवापासून पाणी सुद्धा पिणार नाही असा इशाराही धनंजय देशमुख म्हणाले आहेत.