Ladaki Bahin Yojana: खूशखबर! ५ वर्षांपर्यंत टेन्शन घेऊच नका, पैशांनी भरणार 'इतक्या' महिलांचं खातं
Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या उत्सवाआधीच राज्यातील कोट्यावधी महिलांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पुढील ५ वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'या' महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार पैसे
३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी करू शकता अर्ज
'या' महिलांच्या खात्यात जमा झाले पैसे
Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या उत्सवाआधीच राज्यातील कोट्यावधी महिलांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पुढील ५ वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे. (To empower women financially, the government has announced a scheme to deposit Rs 1,500 in women's accounts every month. Eligible women will get benefits through this scheme for the next 5 years)
ADVERTISEMENT
या महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार पैसे
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा करणार आहे. ज्या महिलांच वय २१ ते ६५ वर्षांमध्ये आहे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, त्या महिलांना सक्षम करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जात आहे. या योजनेचा लाभ पुढील पाच वर्ष मिळणार आहे.
३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी करू शकता अर्ज
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळं जवळपास दीड कोटी महिलांना थेट फायदा होईल, अशी आशा आहे. हिंदूस्थान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बुधवारी बुधवारी १४ ऑगस्टपर्यंत १.६९ कोटी अर्ज जमा झाले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर जवळपास १.३६ कोटी अर्ज वैध्य ठरवण्यात आले आहेत. सरकारने योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे भविष्यात लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Badlapur News: "ती संस्था RSS आणि भाजपची..." नाना पटोलेंचा भाजपवर खळबळजनक आरोप
या महिलांच्या खात्यात जमा झाले पैसे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात योजनेची अधिकृत सुरुवात केलीय. परंतु, योजनेचा लाभ महिलांना आधीच मिळू लागला आहे. राज्य सरकारने आधीच ३० लाख महिलांच्या खात्यात ३-३ हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. जुलै २०२४ पासून या योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळत आहे. याच कारणामुळे लाभार्थींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे पाठवले जात आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
महाराष्ट्रातील स्थानिक महिला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
लाभार्थी महिला महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असणं आवश्यक
महिलांचं वय २१ ते ६५ वर्षांमध्ये असलं पाहिजे
विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत या सर्व महिलांना लाभ मिळणार
अर्ज करणाऱ्यांचं त्यांच्या नावाचं बँक खातं असणं आवश्यक
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Badlapur News: बदलापूरच्या घटनेमागे कुणाचा हात? CM शिंदेंनी कुणावर केले आरोप?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, ओळखपत्र, बँक खाते, जात प्रमाणपत्र, रहीवासी दाखला, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, वोटर आयडी.
'असा' करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
अर्ज करण्यासाठी सरकारने नारी शक्ती दूत अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकता. हे अॅप एन्ड्रॉईड प्ले स्टोर आणि आयओएस अॅपवर स्टोरवर उपलब्ध आहे. ज्या महिला ऑनलाईन अर्ज करु शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा दिली गेली आहे. अंगणवाडी सेवक, ग्रामसेवक यांच्या मदतीनं ऑफलाईन अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही.
ADVERTISEMENT