Titanic जहाज नेमकं कसं बुडालेलं?, अंगावर काटा आणणारा 111 वर्षांपूर्वीचा इतिहास!
अटलांटिक महासागरात 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. त्याचं कारण म्हणजे टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या शोधात पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी बेपत्ता झाली. अन् अखेर आज (23 जून) त्यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली.
ADVERTISEMENT

Iconic Titanic Ship History : अटलांटिक महासागरात 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. त्याचं कारण म्हणजे टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या शोधात पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी बेपत्ता झाली. अन् अखेर आज (23 जून) त्यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली. ओशनगेट या कंपनीने पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करत माहिती दिली आहे. या पाणबुडीतील 5 प्रवाशांनी 2 कोटी रुपये देऊन तिकिटे खरेदी केले होते.
आता काही लोक या अॅडव्हेंचर्स ट्रीपवर टीका करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जी जागा आपण एक मृत्यूचा भोवरा मानला पाहिजे तिथे लोकांना एक अॅडव्हेंचर्स स्थळ म्हणून दाखवण्यासाठी नेलं जात आहे . तर काही लोकांनी या प्रवासाची तुलना आत्महत्या मोहिमेशी (Suicide Mission) केली आहे. चला तर मग १११ वर्षांपूर्वी घडलेल्या टायटॅनिक जहाचाच्या दुर्घटनेविषयी जाणून घेऊयात .
Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं
महाकाय टायटॅनिकचा 111 वर्षांपूर्वीचा इतिहास
टायटॅनिक हे एक विशालकाय जहाज होते. त्याचे खरे नाव आरएमएस टायटॅनिक होते. या जहाजाविषयी असे म्हटले जात होते की, देवही या जहाजाला बुडवू शकत नाही. त्याची लांबी 269 मीटर होती आणि त्याची निर्मिती स्टीलपासून करण्यात आली होती. यात सुमारे 3300 लोकांसाठी राहण्याची सोय होती, ज्यात क्रू आणि प्रवाशांचा समावेश होता. तसंच, हे जहाज ब्रिटनहून अमेरिकेला जात असताना रात्रीच्या वेळी अटलांटिक महासागरात याचा अपघात झाला आणि काही तासांतच जहाज बुडाले. आजही त्याचे अवशेष तिथेच पडून आहेत, ते काढता आले नाही.
नुकत्याच झालेल्या घटनेत सहभागी असलेले लोक हेच अवशेष पाहण्यासाठी गेले होते. टायटॅनिकबद्दल असे म्हटले जात होते की त्याची रचना अशी होती की एका खोलीत पाणी भरले तर ते दुसऱ्या खोलीला बुडवू शकत नव्हते असे सांगण्यात आले होते. कारण त्यात अनेक तळघरे होती. ज्या वॉटरटाइट भिंतीपासून बनवल्या होत्या. तळघराच्या दोन रांगा पाण्याने भरल्या तरी हे जहाज बुडणारे नव्हते.
Titan Submersible : टायटॅनिक बघायला जाणं ठरलं जीवघेणं, समुद्रात काय घडलं?
Titanic जहाज कधी आणि कुठे बुडाले?
टायटॅनिक जहाज दुर्घटनेच्या काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा ग्रीनलँडच्या एका भागापासून हिमनदीचा 500 मीटर मोठा तुकडा वेगळा झाला होता. ते हवेतून आणि समुद्रातून दक्षिणेकडे जाऊ लागले. त्यानंतर 14 एप्रिलपर्यंत ते 125 मीटर झाले होते. 14 एप्रिल 1912 रोजी त्याच हिमखंडाच्या तुकड्यावर टायटॅनिक आदळली अन् टक्कर झाली. त्यानंतर चार तासांत जहाज बुडाले. तेव्हा जहाजाचा वेग ताशी 41 किलोमीटर होता. तो इंग्लंडमधील साउथॅम्प्टनहून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराकडे वेगाने जात होता. घटनेच्या वेळी जहाजात 2,200 लोक होते. या अपघातात 1500 लोकांचा मृत्यू झाला. याला आतापर्यंतचा सर्वात मोठा सागरी अपघात म्हटले जाते.
टायटॅनिकच्या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिका सरकारने चौकशी केली. त्यानंतर हिमखंडाशी टक्कर हे कारण देण्यात आले.
2000 ची बॉडी बॅग 6800 ला! BMC कोविड सेंटर घोटाळा, ईडीच्या हाती स्फोटक माहिती
जहाजाचे अवशेष कुठे सापडले?
टायटॅनिक जहाजाचे अवशेष सप्टेंबर 1985 मध्ये सापडले होते. हे समुद्रसपाटीपासून 2600 फूट खाली अटलांटिक महासागरात आहेत. त्याचा शोध घेण्याचं काम अमेरिका आणि फ्रान्सने केलं. अमेरिकेच्या नौदलाने या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या ठिकाणी हा मलबा सापडला ते कॅनडातील सेंट जॉन्सच्या दक्षिणेस 700 किमी आणि अमेरिकेतील हॅलिफॅक्सच्या 595 किमी आग्नेयेला आहे. जहाज दोन तुकड्यांमध्ये सापडले, दोन्ही एकमेकांपासून 800 मीटर अंतरावर पडलेले होते. आजूबाजूला खूप मलबा पडलेला होता.